Heart Attack Early Symptoms: हार्ट अटॅक ही एक गंभीर स्थिती आहे. जी अनेकदा जीवघेणी ठरते. त्यामुळेच लोकांना हार्ट अटॅकची भिती वाटते. अशात लोक याच प्रयत्नात असतात की, त्यांनी असं कोणतही काम करू नये ज्याने त्यांना हार्ट अटॅकचा धोका वाढेल. हार्ट अटॅकपासून बचाव करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे हृदयासंबंधी समस्यांकडे किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जर तुम्हाला शरीरात अचानक काही बदल दिसत असतील किंवा अशी समस्या दिसत असेल जी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकशी निगडीत आहे तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
हार्ट अटॅक येण्याआधी शरीर वेगवेगळे संकेत देतं. त्यातीलच एक म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणे ही समस्या तुमच्या हार्ट हेल्थचा एक संकेत असू शकतो. असा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.
मोनाश यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी एक रिसर्च केला. ज्यात त्यांना आढळलं की, बद्धकोष्ठतेची समस्या हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हार्ट फेल होण्यासारख्या समस्यांचं एक लक्षण असू शकते.
बद्धकोष्ठता हार्ट अटॅकचं लक्षण?
या रिसर्चचे लेखक आणि प्रोफेसर फ्रान्सिस मार्क्स यांनी सांगितलं की, रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या भलेही कॉमन असेल, पण याकडे सामान्यपणे सगळेच दुर्लक्ष करतात. मात्र, ही समस्या कार्डिओवस्कुलर हेल्थसंबंधीा समस्येचा एक संकेत असू शकते.
अमेरिकन जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टसारख्या समस्यांचा धोका इतर लोकांच्या तुलनेत दुप्पट होता.
बद्धकोष्ठता आणि हार्ट अटॅकचा संबंध काय?
जाणकारांनुसार, आपलं शारीरिक आरोग्य आणि गटची म्हणजे आतड्यांची कार्यक्षमता हृदयाच्या आरोग्यावर प्रभाव टाकते. जर तुमची गट हेल्थ चांगली नसेल आणि तुम्ही एक्सरसाईज करत नसाल किंवा संतुलित आहार घेत नसाल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. बद्धकोष्ठतेची ही जुनी समस्या तुमच्या हृदयाचं नुकसान करू शकते. याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.