Garlic Before Meal : लसणाचं सेवन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थांमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसणामुळे पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबतच आरोग्यालाही एकापेक्षा फायदे मिळतात. जे लोकांना फारसे माहीत नसतात. अनेक आजार लसणाच्या मदतीने दूर करण्यास मदत मिळते.
लसूण खाण्याचे फायदे
असं मानलं जातं की, रोज दुपारीच्या जेवणाआधी २ लसणाच्या कळ्या खाल्ल्याने आरोग्याने अनेक प्रकारचे फायदे मिळतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
हृदय राहतं निरोगी
हृदयासाठी लसूण फारच फायदेशीर मानला जातो. याचं सेवन केल्याने हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी होतो. लसणामधील सल्फर ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यात मदत ककरतं. सोबतच याने हृदय हेल्दी आणि मजबूत राहतं.
यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यास मदत मिळते. हे फ्री रॅडिकल्स कॅन्सरच्या कोशिका वाढवण्यास कारणीभूत ठरत असतात.
इन्फेक्शन कमी होतं
लसूण एक नॅचरल अॅंटी-बायोटीक आहे. यातील अॅंटी-बॅक्टेरिअल गुण वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शनपासून लढण्यास, इम्यूनिटी सिस्टीम मजबूत करण्यास मदत करतात. रोज कच्च्या लसणाचं सेवन केल्याने सर्दी आणि खोकला कमी करण्यासही मदत मिळते.
अर्थरायटिसचा धोका कमी
अर्थरायटिसची समस्या असल्यावर लसणाचं सेवन केल्याने खूप फायदा मिळतो. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण आढळतात जे अर्थरायटिसचं दुखणं आणि असहजता कमी करण्यास मदत करतात.
पचनशक्ती मजबूत होते
पचनशक्ती मजबूत करण्यासाठी लसूण खूप फायदेशीर ठरतो. याने डायजेस्टिव सिस्टीम डिटॉक्सीफाय करण्यास आणि पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास मदत मिळते.
हाडंही मजबूत होतात
हाडांसाठी सुद्धा लसूण फार फायदेशीर मानला जातो. याने बोन डेंसिटी वाढते. यामुळे हाडं मजबूत होतात आणि हाडांसंबंधी अनेक समस्यांचा धोकाही कमी होतो.
त्वचेसाठीही फायदेशीर
लसूण आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असतो. यातील अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-ऑक्सिडेंट गुणांमुळे त्वचेवर होणारं इन्फेक्शन कमी करण्यास मदत मिळते आणि त्वचा चमकदारही होते.