आयुर्वेदात प्रत्येक आजारासाठी औषध आहे. आपण भारतीय अत्यंत भाग्यशाली आहोत की, आपला जन्म या भूमीत झाला आहे, डायबेटीज, हायपर टेन्शन आणि इतरही आजारांवर आयुर्वेदात उपचार आहेत. आम्ही आज तुम्हाला अशा तीन पानांबद्दल सांगणार आहोत जे उपाशी पोटी खाल्ल्यावर तुमच्या समस्यांवर जादूप्रमाणे काम करतात. ही पान आपल्या आजूबाजूच्या परीसरात सहज उपलब्ध असतात. जाणून घेऊया या तीन्ही पानांचे फायदे.
तुळशीची पानआयुर्वेदात तुळशीच्या पानांना फार महत्व आहे. त्यामुळेच आपल्या सर्वांच्यांच घरात तुळस असते. आपल्या आजीआजोबांच्या काळात गावाच्या अंगणात तुळस असायचीच आणि तिची रोज सकाळी मनोभावे पुजा केली जायची. रोज काही खाण्यापूर्वी तुळशीची पान चावून खाल्ल्यास डायबेटीज, हायपरटेंशन आणि हार्ट प्रॉब्लेम नियंत्रणात राहतात. फक्त लक्षात घ्या तुळशीच्या पानांमध्ये पारा (mercury) आणि लोह असते. त्याचे अतिसेवनही शरिरासाठी धोकादायक ठरू शकते. तुमच्या दातांवर याचा परीणाम होऊ शकतो. अशावेळी तुम्ही तुळशीची पानं पाण्यासोबत एकत्र करून त्याचे सेवन करू शकता.
कढीपत्त्याची पानंआपल्या जेवणात पदार्थांची चव वाढवण्यासाठी आपण कढीपत्त्याची पान वापरतोच वापरतो. त्यामुळे पदार्थाला तर चव प्राप्त होतेच पण आपल्या शरीरात अनेक गुणधर्मांचा प्रवेश होतो. डायबेटीजच्या रुग्णांसाठी कढीपत्ता म्हणजे वरदान आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते.
कडूलिंबाची पानंआयुर्वेदातील असं पानं ज्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कित्येक आजारांवर कडुलिंबाची पानं रामबाण उपाय आहेत. कडूलिंबाच्या पानांचा उपयोग त्वचेवर उठलेल्या अॅलर्जीसाठी केला जातो. अशावेळी कडुलिंबाच्या पाने पाण्यात उकळून त्याची आंघोळ केली जाते. डायबेटीज असल्यास कडूलिंबाची पानं खावीत. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच अंशी नियंत्रणात येते. कडूलिंबात अॅंटीहिस्टामाइन असते त्यामुळं रक्तवाहिन्या पातळ होतात. हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असणाऱ्यांसाठी कडूलिंब फार उपयोगाचे आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा. कडूलिंबाच्या पानांचे अतिसेवन केल्यास तुमची साखरेची पातळी खुप कमी होऊ शकते जे ही शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कडुलिंबाची पाने खाल्ल्यावर सतत शुगर चेक करत राहणे हा एक उपाय आहे.