शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

मक्याच्या धाग्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, वाचाल तर कधीच फेकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 4:54 PM

Corn silk Benefits : कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात.

Corn silk Benefits : पावसाळा आला की, सगळ्यांना भुट्टा खाण्याची चाहूल लागते. पावसाच्या रिमझिम धारा आणि लिंबू व मीठ लावलेला गरमागरम भुट्टा कुणालाही हवा हवा वाटतो. पण जास्तीत जास्त लोक मक्याच्या सालीसह त्यातील पांढरे धागेही कचरा म्हणून फेकतात. या मुलायम आणि चमकदार धाग्यांना कॉर्न सिल्क म्हटलं जातं. या धाग्यांचं महत्व अनेकांना माहीत नसतं. कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच याने शरीरात ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित राहतं.

ताज्या किंवा वाळवलेल्या दोन्ही रूपात कॉर्न सिल्कचा वापर केला जाऊ शकतो. अनेक आजारांच्या औषधांमध्येही याचा वापर केला जातो. ब्लेडरमध्ये इन्फेक्शन, यूरिनरी सिस्टीममध्ये सूज, किडनी स्टोन, डायबिटीज, जन्मापासून हृदयाची समस्या, हाय ब्लड प्रेशर आणि चक्कर येणे असा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. जाणून घेऊ कॉर्न सिल्कचे आरोग्यदायी आणखीही फायदे...

हाय ब्लड शुगर कमी करत

हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त लोकांसाठी मक्याचे हे धागे फायदेशीर आहेत. याने शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि शुगरचं प्रमाण कमी केलं जातं. 

व्हिटॅमिन सी

जे मक्याचे धागे आपण न वापरता फेकून देतो, त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असत. हे एक चांगलं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि कार्डियोवस्कुलर रोगापासून याने बचाव होण्यास मदत मिळते. तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला होतो. 

किडनीची समस्या दूर करा

किडनीच्या समस्येवर घरगुती उपाय करायचा असेल तर कॉर्न सिल्कचा वापर करू शकता. याने यूटीआय, ब्लेडर, इन्फेक्शन, किडनी स्टोन, यूरिनरी सिस्टममध्ये सूज येणे अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते. 

डोकेदुखीपासून आराम

सतत तुम्हाला डोकेदुखीची समस्या होत असेल तर तुम्ही कॉर्न सिल्क टी चं सेवन करू शकता. यात अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी आणि ऐनलगेसिक गुण असतात. याने तुम्ही स्ट्रेस आणि टेन्शन फ्रि होऊ शकता. इतकेच नाही तर खांदेदुखी, मान दुखणे, जबडा अडकणे अशाही समस्या याने दूर होण्यात मदत मिळू शकते. 

पचनक्रिया चांगली राहते

कॉर्न सिल्कने व्यक्तीची पचनक्रिया चांगली राहते. काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मक्याचे हे धागे लिवर द्वारे बाइल सेक्रेशनला वाढवतात. बाइल गालब्लेडरमध्ये एकत्र होतात, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होतं. 

वजन कमी करण्यास मदत

कॉर्न सिल्कमध्ये कॅलरी कमी असतात, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. यापासून तयार चहा सेवन केल्याने पोट भरलेलं राहतं आणि याने शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. 

त्वचेसंबंध समस्या होतात दूर

कॉर्न सिल्कने त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. खरचटणे, पिंपल्स, खाज, किटक चावणे यापासून आराम मिळतो. यातील अ‍ॅंटीबॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी सेप्टीक गुण त्वचेची रक्षा करतात. 

कसा कराल कॉर्न सिल्कचा चहा

मक्याचे धागे तसेच खाण्याची कोणतीही पद्धत नाहीये. तुम्ही याचं सेवन चहाच्या रूपात करू शकता. एका भांड्यात पाणी उकडा आणि त्यात ताजे कॉर्न सिल्क टाका. काही मिनिटे हे उकडू द्या आणि थंड होऊ द्या. काही वेळाने या चहाला भुरका रंग येईल. त्यानंतर हा चहा गाळून घ्या. याची टेस्ट चांगली करण्यासाठी तुम्ही यात लिंबाचा रसही घालू शकता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य