कोरोनाचा हाहाकार भारतासह संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. कोरोनाच्या माहामारीवर नियंत्रण मिळवण्याासाठी जगभरातील विविध देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. एका संशोधनानुसार कोरोना व्हायरसच्या लक्षणांपासून बचाव करण्यासाठी एमएमआर लस प्रभावी ठरू शकते. ही लस दिल्याने कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होणारी सेप्टिक सुज कमी करता येऊ शकतं.
अमेरिकन सोसायटी फॉर मायकोबायोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे. त्यांच्याबद्दल काळजीचे कारण नाही. पण आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या लोकांसाठी एमएमआर (Corona & MMR Vaccine) फायदेशीर ठरू शकते. कारण कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे आरोग्य सेवेतील लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते.
लुइसियाना स्टेट हेल्थ स्कूलचे रिसर्च एसोसिएट डीन डॉ. पॉल फिडेल, यांनी दिलेल्या माहितीनुसार माहामारीच्या काळात जोखिम जास्त असलेल्या ठिकाणी लोकांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी ही लस उपयोगी ठरू शकते. असे परिक्षणातून दिसून आले हे. एमएमआर लसीमुळे कोणत्याही समस्या उद्भवतील असं मला वाटत नाही; त्यामुळे कोरोनाच्या संक्रमणाशी सामना करता येईल, असंही फिडेल म्हणाले.
यूएसएस रूजवेल्टवर ९५५ नाविकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांची टेस्ट पॉजिटिव्ह आली. त्यातील फक्त एका व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासली, कारण एमएमआर लसी ही सगळ्या सैनिकांना देण्यात आली होती. याशिवाय ज्या लोकांनी एमएमआर लस घेतली आहे. त्यांच्यातील मृत्यूदर कमी दिसून आला.
संशोधकांनी वैद्यकीय परिक्षणाचा प्रस्ताव मांडला आहे. जेणेकरून एमएमआर लस कोरोनापासून कितपत बचाव करू शकते हे निदर्शनास येईल. त्यानुसार आरोग्य विभागात कार्यरत असलेला कर्मचारी वर्ग, सांभाळ करणारे कामगार, नर्स, वयस्कर लोक यांना लस देता येईल.
दरम्यान देशातील कोरोनाबाधितांचा आकडा बुधवारी ४ लाख ५६ हजारांवर गेला असताना, त्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ४२ हजार ९०० रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५१.६४ टक्के आहे. हे प्रमाण समाधानकारक वाटत असले तरी देशाच्या तुलनेत ते कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७१ टक्के आहे. मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील अर्थचक्र पुन्हा सुरू करण्यातही सरकारला अडचणी येत आहेत.
सावधान! जास्त वेळ एकाच जागी बसल्याने वाढत आहे कॅन्सरचा धोका; जाणून घ्या रिसर्च
चपला, बुटांसोबत तुम्ही कोरोना विषाणूही घरी आणताय का? 'अशी' घ्या काळजी