नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अवलंबलेल्या पद्धतींचा अवलंब करण्याची गरज आहे. कोरोना लाटांमध्ये जगभरात प्रतिबंधासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करण्यात आला होता, तर भारतात वेळोवेळी विशेषत: आयुष मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. या शिफारशींचे पालन केल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती घेऊन त्यांचा अवलंब करण्याची गरज आहे.
आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाला फक्त आयुर्वेदिक पद्धतींनीच नव्हे तर योगासने, व्यायाम आणि योग्य दिनचर्येद्वारेही रोखले जाऊ शकते. दुसरीकडे, सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना संसर्गाच्या बाबतीत, आयुषच्या या उपायांचा अवलंब करून आपण निरोगी होऊ शकतो. याशिवाय, कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आयुषचे उपायही खूप उपयुक्त आहेत.
कोरोना होऊ नये म्हणून 'हे' उपाय करा
- रोज कोमट पाणी प्या. दिवसभरात जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.- अर्धा चमचा हळद पावडर 150 मिली कोमट दुधात दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्या.- तुम्ही जे काही खात आहात ते ताजे आणि सहज पचणारे असावे, याची काळजी घ्या.- तुमच्या रोजच्या आहारात काही प्रमुख मसाल्यांचा वापर करा. यामध्ये हळद, सुंट, जिरे, धणे पावडर आणि लसूण यांचा समावेश आहे.- तुमच्या आहारात आवळा, आवळ्याचा जाम, लोणची, चटणी यांचा समावेश करा.- हळद आणि मीठ टाकून गुळण्या करा.- पाण्यात पुदिन्याची ताजी पाने किंवा ओवा आणि कापूर टाकून वाफ घेऊ शकता.- दररोज किमान 30 मिनिटे योग, प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही या उपायांचा अवलंब करू शकता.
- रोज 10 ग्रॅम च्यवनप्राश खाऊ शकता. मधुमेही रुग्ण साखरमुक्त च्यवनप्राश घेऊ शकतात.- आले किंवा सुंठ, काळी मिरी, दालचिनी, मोठी वेलची आणि मनुके घालून काढा बनवा आणि दिवसातून एक किंवा दोनदा घ्या.- रोज ताजी, हंगामी, रसाळ आणि फळे खा. जसे की मोसंबी, संत्री, लिंबू इ.- साखरेऐवजी गूळ खा.- रोज पौष्टिक आहार घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.