मुंबई – गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीमुळे जगभरात मोठं संकट निर्माण केले. कोरोनाच्या दहशतीमुळे लोकांना लॉकडाऊनमध्ये राहावं लागत होते. कोरोनानं लाखो लोकांचे जीव घेतले. आता लसीकरणामुळे हळूहळू कोरोनाची दहशत लोकांच्या मनातून जाताना दिसत आहे. पण IIT मुंबईनं केलेल्या रिसर्चमुळे पुरुषांची चिंता वाढली आहे. जर कुठल्याही पुरुषाला कोरोना झाला असेल तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम झाल्याचं समोर आले आहे.
म्हणजे पुरुषांच्या स्पर्मची क्षमता कमी झाल्याचा खळबळजनक दावा आयआयटी मुंबईनं केलेल्या रिसर्चमध्ये झाला आहे. या रिसर्चमध्ये म्हटलंय की, जर कुठल्याही पुरुषाला कोरोनाचं सौम्य अथवा मध्यम संक्रमणही झाले असेल तर त्याच्या शरीरातील प्रोटीन पातळीत बदल होण्याची शक्यता आहे. त्या बदलामुळे पुरुषाच्या स्पर्मची क्षमता कमी होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम बाळाला जन्म देण्यावरही होऊ शकतो. कोरोना झाल्यानंतर पुरुषांच्या वीर्यावर त्याचा कितपत बदल झाल्याचं दिसून येते यासाठी हा रिसर्च करण्यात आला होता.
रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला असून एसीएस ओमेगा नावाच्या जर्नलमध्ये रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. या जर्नलमधील छापील रिपोर्टनुसार, Sars Cov 2 व्हायरलमुळे कोरोनाची लागण होते. त्यामुळे मानवी शरीरारा श्वास घेण्यास त्रास होतो. परंतु हा व्हायरस शरीरातील अन्य पेशींवरही त्याचा प्रभाव टाकू शकतो. या व्हायरसमुळे शरीरातील पेशींमध्ये झालेला बदल दिसून आला आहे. म्हणजे पुरुषांमध्ये मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेवर त्याचा प्रभाव पडल्याचं दिसून आले आहे.
रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हा व्हायरस पुरुषांच्या रिप्रोडक्टिव सिस्टममध्ये आढळला आहे. सरळ भाषेत सांगायचं झालं तर कोरोना व्हायरस पुरुषांच्या शरीरातील ज्या भागात आढळला आहे ज्यामुळे सेक्स आणि मुलांना जन्म देण्याच्या ताकदीवर प्रभाव पडत आहे. या रिसर्चमध्ये मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये संशोधकांनीही भाग घेतला होता. या टीमने १० निरोगी पुरुषांच्या वीर्यातील प्रोटीन पातळी आणि १७ कोरोना संक्रमित झालेल्या पुरुषांच्या वीर्याची प्रोटीन पातळीची तुलना केली. हे सर्व पुरुष २० ते २५ वयोगटातील होते. यातील कुणीही प्रजनन क्षमतेत कमी आणि संबंधातील थकवा या अडचणींचा सामना केला नव्हता. रिसर्चमध्ये आढळलं की, ज्या पुरुषांना कोरोना झाला होता त्यांच्या वीर्यातील प्रोटीन पातळीवर प्रभाव पडला आहे. ज्यांना कोरोना झाला नाही त्यांच्या तुलनेने कोरोना झालेल्या पुरुषांच्या स्पर्म काऊंटमध्ये कमी दिसून आली आहे.