कोरोना व्हायरसच्या माहामारीने जगभरात कहर केला आहे. दिवसेंदिवस धडकी भरवणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर येत आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. जगभरातील आरोग्य तज्ज्ञ कोरोना विषाणूंवर लस किंवा औषध उपलब्ध होण्यासाठी संशोधन करत आहेत. कोरोनाचा सामना केल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात कोणकोणते बदल होतात. याचाही अभ्यास तज्ज्ञ करत आहेत.
कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. त्यानंतर २ आठवड्यांपर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरात व्हायरस जीवंत असतो. त्यामुळे इतर व्यक्तींना संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो.कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात एंटीबॉडीज तयार होतात. या एंटीबॉडीजमुळे दुसऱ्यांना कोरोना संक्रमण होण्यापासून बचाव करता येऊ शकतो. या गोष्टी लक्षात घेऊन रिसर्च करण्यात आला होता. ब्रिटेन आणि स्पेनमध्ये हा अभ्यास करण्यात आला होता.
एंटीबॉडीजवर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या देशातींल संशोधनात दिसून आले की कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला नष्ट करण्यासाठी ज्या एंटीबॉडिज तयार झालेल्या असतात. त्या काही आठवड्यात शरीरातून नष्ट होतात. अशा स्थितीत संक्रमणाचा धोका दुप्पटीने वाढतो. कोरोनाच्या एंटीबॉडी संबंधी हा अभ्यास द गार्डीयनमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. जेव्हा रुग्णांच्या शरीरात कोरोनाची लक्षणं दिसून येतात तेव्हा ३ आठवड्यांपर्यंत एंटीबॉडीज शरीरात असतात. काहीवेळ जीवंत राहण्यासाठी शरीरात एंटीबॉडीज तयार होतात. पण एकदा संक्रमण झाल्यानंतर पुन्हा संक्रमण होण्याची दाट शक्यता असते.
या अभ्यासासोबतच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीवर सुद्धा अभ्यास करण्यात आला. ज्या प्राण्यांमध्ये लसीद्वारे शरीरात एंटीबॉडी टाकल्या जात आहेत. ज्या प्राण्यांमध्ये माणसाच्या तुलनेत कमी एंटीबॉडीज दिसून आल्या. या अर्थ असा की कोरोनाची लस घेतल्यानंतर ही तुम्ही कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित आहात असं म्हणता येणार नाही. त्यासाठी वेळोवेळी लसीकरण करावे लागेल. तेव्हाच कोविड 19 ने होत असलेल्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. ज्या व्यक्तीला एकदा कोरोनाचे संक्रमण झाले आहे. अशा व्यक्तींना परत कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते.
आता काही सेकंदात फक्त १०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी ; IIT च्या तज्ज्ञांचे संशोधन
CoronaVirus News : कोरोना हवेतून पसरतो का? जाणून घ्या, या मागील सत्य...