नव्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाच्या प्रसाराबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. देशात कोरोना व्हायरसचा ग्राफ वेगानं खाली येत आहे. कोरोनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे की, नवीन वर्षाकडे जाताना कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. डिसेंबर २०२० मध्ये पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत कोरोनाचे सगळ्यात कमी रुग्ण समोर आले आहेत. डिसेंबरमध्ये ५० टक्के कोरोना रुग्णांमध्ये घट आढळून आली आहे.
जून २०२० नंतर पहिल्यांदाच असं झालं की, देशात कोरोनाच्या केसेसमध्ये १० लाखांची घट दिसून आली होती. नोव्हेंबरच्या तुलनेत ३५ टक्के रुग्ण समोर आले आहेत. नवीन वर्षाच्या सुरूवातीला ही आनंदाची बातमी आहे. या आकडेवारीवर लक्ष दिल्यास दिसून येईल की ३० नोव्हेंबरला देशात रुग्णांची संख्या ४०,८६८ इतकी होती. त्यानंतर ३० डिसेंबरला ही संख्याकमी होऊन तब्बल २०,५०७ इतकी झाली होती. म्हणजेच कोरोनाच्या केसेसमध्ये ५० टक्क्यांनी कमतरता दिसून आली होती.
राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे. २३ डिसेंबरला दिल्लीतील कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट कमीत कमी स्तरापेक्षाही कमी रेकॉर्ड करण्यात आला होता. राजधानीमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे.
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची भीती कायम
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच आता ब्रिटनमधून पसरलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची भीती कायम आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा प्रसार भारतात झाला असून एकूण २५ लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. या २५ रुग्णांना सध्या आयसोलेशनमध्ये ठेवलं जाणार आहे. २४ डिसेंबरला भारतात आलेल्या हजारो लोकांची चाचणी आरोग्य मंत्रालयाकडून केली जात आहे. तसंच या लोकांच्या संपर्कात असेलल्यांचीही माहिती घेतली जाणार आहे. coronavirus: नव्या वर्षातील मोठी बातमी, फायझरच्या लसीला WHOची मान्यता, आपातकालीन वापरास परवानगी
नव्या व्हायरसची लक्षणे
नव्या कोरोना व्हेरिएंटची लक्षणेही ओरिजीनल कोविड १९ च्या समान आहेत. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशनने कोविड १९ ची नवीन स्ट्रेनची ५ गंभीर लक्षणे सांगितली आहेत. यावर प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्हालाही ही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती
- श्वास घेण्यास त्रास होणे
- भ्रम झाल्यासारखं वाटणे
- सतत छातीत दुखणे
- थकवा जाणवणे
- चेहरा आणि ओळ निळे पडणे
किती धोकादायक आहे नवा स्ट्रेन
नव्या कोरोना व्हेरिएंटबाबत नुकताच लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅन्ड ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये एक रिसर्च करण्यात आला. ज्यात सांगण्यात आलं की, नवा कोविड स्ट्रेन लंडनमधील मृतांचा आकडा वाढवू शकतो. तज्ज्ञांना अशीही भीती आहे की, २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये पसरणाऱ्या म्युटेशनने रूग्णांची संख्या अधिक वाढेल. तसेच तज्ज्ञ म्हणाले की, या नव्या स्ट्रेनचा धोका लहान मुलांना सुद्धा आहे.