शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

कोरोनाचा आठ महिने शरीरात मुक्काम; रुग्णांनी आरोग्याबाबत राहावे सतर्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 7:42 AM

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग हवेतून तसेच फुफ्फुसांच्या वाटेने अधिक प्रमाणात होतो, असे संशोधनात म्हटले आहे.

वॉशिंग्टन : कोरोनाचा सार्स कोव्ह २ हा विषाणू माणसाच्या मेंदूपासून शरीरातील इतर अवयवांमध्येही पसरतो. तिथे त्याचे अस्तित्व सुमारे आठ महिन्यांपर्यंत राहते. कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या उतींच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केले आहे.कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग हवेतून तसेच फुफ्फुसांच्या वाटेने अधिक प्रमाणात होतो, असे संशोधनात म्हटले आहे. 'नेचर'मध्ये याबाबत अहवाल प्रसिद्ध झाला आहे. कोरोना रुग्णांच्या शरीरातील ८४ टक्के अवयवांमध्ये सार्स कोव्ह २ विषाणूचे अस्तित्व आढळून आले, असे संशोधकांनी म्हटले आहे.

बालके कोरोना लसीमुळे सुरक्षित■ बालकांना मल्टिसिस्टिम इनफ्लेमेटरी सिंड्रोमचा (एमआयएस-सी) त्रास झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस घेणे सुरक्षित आहे, असे एका संशोधनातून आढळून आले. कोरोना संसर्ग निवळल्यानंतर मुलाच्या शरीरात प्रतिपिंडे विकसित होतात. त्यामुळे मुलाच्या शरीरातील अवयवांना अॅलर्जीचा त्रास जाणवू शकतो.■ त्याला एमआयएस सी म्हणतात. त्याचा त्रास पुन्हा जाणवला तरी त्यामुळे प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्याचे उदाहरण अद्याप समोर आलेले नाही. या संशोधनात सहभागी झालेल्या रुग्णांपैकी काही जणांना हात दुखणे, थोड्या प्रमाणात थकवा, अशी सौम्य लक्षणे जाणवली.

नोझल स्टॅब चाचणी अधिक प्रभावीसध्या प्रचलित असलेल्या चाचण्यांतून ज्यांचा शोध लागत नाही, अशा विषाणूंचे अस्तित्व नोझल स्टॅब चाचणीद्वारे ओळखता येऊ शकते, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. लॅन्सेट मायक्रोब जर्नलमध्ये या संशोधनावर आधारित लेख प्रसिद्ध झाला आहे. कोरोना आजाराचे नवे विषाणू त्यांचा शोध लागण्यापूर्वीच जगभरात पसरलेले असतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य