गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. लोकांच्या शरीरात काही प्रमाणात कोरोनाशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार व्हायला सुरूवात झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य तज्ज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, ''विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी कमीतकमी 70 टक्के लोकांच्या शरीरात विषाणू विरोधी एंटीबॉडी विकसित करण्याची गरज आहे.'' बिझनेस टुडेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, "जरी हे एक कठीण काम वाटत असले तरी गोवरच्या बाबतीत प्रतिकारशक्तीची मर्यादा ९५ टक्क्यांहून अधिक आहे, जी अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे."
पुढे त्या म्हणाल्या की, "कोविड -१९ साथीने जगाचा नाश केला. मोठी आशा होती की अधिक लोकांना विषाणूची लागण होईल, यामुळे लोकांच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती विकसित होईल आणि आजारांशी लढत असलेल्या एंटीबॉडीज विकसित होतील. ७० ते ८० टक्के लोकांच्या शरीरात एंन्टीबॉडीज तयार होणार नाही तोपर्यंत हा विषाणू एका व्यक्तीकडून इतर व्यक्तीपर्यंत पसरत राहील.''
डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाले की, ''सध्याच्या वैद्यकीय अभ्यासानुसार असे म्हणतात की या विषाणूंविरूद्ध प्रतिकारशक्ती ८ महिने टिकते. काही लस उत्पादक असा दावा करतात की त्यांच्या लसीपासून प्रतिकारशक्ती बर्याच वर्षांपर्यंत राहिली आहे. हे शक्य आहे परंतु लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता आहे की नाही हे आम्हाला पहावे लागेल.''
जग रोग प्रतिकारशक्तीकडे वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनचा उद्रेक चिंताजनक आहे. जुन्यापेक्षा हा जास्त प्राणघातकदेखील आहे. ''व्हायरस काय करीत आहे यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तो या अँटीबॉडीजपासून पळायला शिकत आहे काय? म्हणूनच लसीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, जे वेगवेगळ्या प्रोटिन्सना लक्ष्य करीत आहेत.आम्ही यावर काम करत आहोत.'' असंही त्या म्हणाल्या.
चिंताजनक! महाराष्ट्रासह ८ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रोसेस्ड चिकनवरही बंदी
भारतासह संपूर्ण जगात लसीकरणाची तयारी सुरू आहे. भारत १६ जानेवारीपासून नागरिकांना लसीकरणासाठी एक कार्यक्रम सुरू करणार आहे. सुमारे ४१ देशांमध्ये २४ दशलक्षाहूनही अधिक लोकांना लसीचा पहिला डोस आधीच मिळाला आहे. यातील बहुतेक लोक अमेरिका, चीन, युरोप आणि मध्य पूर्वचे आहेत.
अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय
पुढे त्यांनी सांगितले की, ''निश्चितपणे असे काही लोक असतील जे लसीकरणाला विरोध करतील. विकसनशील देशांतील बर्याच भागात लोक लस देण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आपला विरोध दिसून येईल. याचे कारण असे आहे की विकसित देशांमध्ये अशा संसर्गजन्य आजारांचा कधीही सामना झाला नाही, ज्यांना लसीकरणाद्वारे बरे करता येते.''