मागच्या काही दिवसात कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कोरोनापासून बचावासाठी लाखो लोकांचे लसीकरणही केलं जात आहे. तर काही लोक अजूनही लस टोचून घ्यायला खाबरत आहेत. अशात कोविड १९ लसीमुळे साईड इफेक्ट्सही पाहायला मिळत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तुमचा आहार लसीकरणानंतर शरीरात होत असलेल्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत असतो.
संतुलित आणि हेल्दी आहार तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी फायेदशीर असतो. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि इंन्फेक्शनचा धोका कमी होतो. आज आम्ही तुम्हाला लसीकरणाआधी आणि लसीकरणानंतर कसा आहार घ्यायचा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबबत सांगणार आहोत.
शरीराला हायड्रेड ठेवणं महत्वाचं आहे. जर तुम्ही कोरोनाची लस घेण्याची तयारी करत असाल तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. अशा पदार्थाचे सेवन करा ज्यात पाणी आणि फायबर्सचं प्रमाण खूप असतं. कोरोनाची लस घेतल्यानंतर साईड इफेक्टसशी तीव्रता कमी होण्यासाठी मदत होऊ शकते.
ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार माहामारीच्या काळात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. जास्त कॅलरीजयुक्त आहार टाळून फायबर्स असलेल्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा. फायबर असलेल्या फळांचा किंवा ज्यूसचा आहारात समावेश करा.
फायबर्सयुक्त आहारामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते. याशिवाय लस घेतल्यांतर पौष्टीक अन्न खायला हवं. ओट्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. जर्नल ऑफ क्लिनिकल स्लीप मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार सॅच्यूरेटेड फॅट्स आणि जास्त साखरयुक्त आहार घेण्यापासून वाचायला हवं. ताण, तणाव किंवा चिंता वाढल्यानं झोपेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कोरोनाची लस घेण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. डाएटच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाही. कारण तुमचा आहार आणि जीवनशैली व्यवस्थित नसेल तर लसीचे साईड इफेक्ट्स तीव्रतेनं दिसू शकतात. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल दिलेल्या माहितीनुसार हायड्रेट राहण्यासाठी हेल्दी, संतुलित आहार आणि जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळे ताण तणावाच्या लक्षणांना कमी करता येऊ शकतं.
जास्त घाम येणं ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण; जाणून घ्या लक्षणं अन् वेळीच व्हा सावध!
लसीकरणानंतर लोकांना ताप, अंगदुखी, त्वचेवर एलर्जी असे साईड इफेक्टस दिसून येत आहेत. अशावेळी तब्येत चांगली ठेवण्यासाठी मद्यपान करू नका. मद्यपान केल्यास साईड इफेक्टसची तीव्रता वाढू शकते. याव्यतिरिक्त रोगप्रतिराकशक्ती कमी होण्याचाही धोका असतो.