शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

Corona Vaccine: लस घेतल्याचा आणखी एक फायदा, काळ्या बुरशीचा धोका कमी; भारतीय तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 6:16 PM

corona mucormycosis: आपण या संदर्भात काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येईल, हे स्पष्ट आहे आणि ती ऑगस्टमध्ये सुरू होऊन नोव्हेंबर महिन्यात तीव्र स्वरुप धारण करेल, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देलस घेतल्यानंतर म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) होण्याची शक्यता कमी होतेसमूह प्रतिकारशक्तीमुळे दुसऱ्या लाटेच्या तुलनेने तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी असेलडेल्टा प्लस व्हेरिअंट काळजीचे कारण आहे.

मुंबई : 'कोव्हिड19 : शिकलेले धडे आणि भविष्याचे नियोजन' या चर्चासत्रामध्ये डेल्टा प्लस कोव्हिड19 व्हेरिअंट (Corona Delta plus varient) ही चिंतेची बाब असल्याचे आणि लवकरात लवकर लस घेणे हेच आपले शस्त्र असल्याचे मत  न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स पॅनलमध्ये व्यक्त करण्यात आले. तातडीने लस घेतल्यामुळे आपण सामुहिक प्रतिकारकशक्ती विकसित करू शकू आणि काळी बुरशी (Black Fungus), आरोग्याची गंभीर गुंतागुंत, साइड इफेक्ट्स, रक्ताच्या गुठळ्या तसेच उपचारांदरम्यान व नंतर होणारे संसर्ग कमी करता येतील. चर्चासत्रात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनुसार आपण या संदर्भात काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येईल, हे स्पष्ट आहे आणि ती ऑगस्टमध्ये सुरू होऊन नोव्हेंबर महिन्यात तीव्र स्वरुप धारण करेल, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली. (Corona Vaccination may reduce of mucormycosis after corona infection.)

चेन्नईमधील मद्रास ईएनटी रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक, ओटोऱ्हायनोलॅरिंगो लॉजिस्ट प्राध्यापक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. मोहन कामेश्वरन म्हणाले, "मार्च महिन्यात आपल्याला म्युकरमायकोसिसचा (mucormycosis) (काळी बुरशी - गंभीर व दुर्मीळ स्वरुपाचा बुरशीचा संसर्ग) रुग्ण पहिल्यांदा दिसून आला. मार्चमध्ये या प्रकाराचे 2 ते 3 रुग्ण होते, ते मे महिन्यात 10 ते 15 झाले आणि हा आजार झालेल्या व्यक्तींमधील मृत्यूदर 40 ते 50 टक्के आहे. हा दर खूप जास्त असला तरी जेवढा असण्याची अपेक्षा केली जात होती, तेवढा हा दर नाही. म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी संबंधित औषधांची कमतरता ही प्रमुख समस्या आहे. तामिळनाडूमध्ये म्युकरमायकोसिसचा फैलाव महामारीच्या दरम्यान झाला."

"काळी बुरशी झालेल्या माझ्याकडे आलेल्या 60 ते 70 टक्के व्यक्तींनी लस घेतली नव्हती. 25-30 टक्के व्यक्तींनी लस घेतली होती आणि 5 टक्क्यांहून कमी व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले होते. म्हणजेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना कोव्हिड-19चा संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे आणि काळी बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यताही फार कमी आहे.", असे ते म्हणाले. तिसऱ्या लाटेबद्दल नवी दिल्लीतील बीएलके मॅक्स हॉस्पिटलमधील वरिष्ठ संचालक आणि इंटर्न मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राजिंदर कुमार सिंगल म्हणाले, "दुसरी लाट अजूनही पूर्णपणे संपलेली नाही आणि तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेने सौम्य असेल. भारताच्या सुमारे 21 टक्के लोकसंख्येने पहिला डोस घेतला आहे, 4% लोकसंख्येने दोन्ही डोस घेतले आहेत. पण संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जलद लसीकरण, कोव्हिड-19ला आळा घालण्यासाठीची काळजी आणि मोठ्या प्रमाणावर फैलाव करणारे कार्यक्रम थांबविणे ही या आजाराचा फैलाव थांबविण्याची गुरूकिल्ली आहे."

अहमदाबाद येथील न्यूबर्ग सेंटर ऑफ जिनॉमिक मेडिसीन डॉ. भाविनी शाह म्हणाल्या, "कोव्हिड 19चा दुसरा डोस घेतलेल्या शेकडो व्यक्तींच्या अँटिबॉडी चाचण्या दर्शवितात की, लोकसंख्येसाठी बूस्टर डोस आवश्यक असतील. गुजरातमधील 30,000 लोकांच्या अँटिबॉडींची पातळी तपासल्यावर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. यापैकी संशोधकांनी 500 आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर भर दिला होता. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दर वर्षी लोकांना फ्लूसारखा बूस्टर डोस घ्यावा लागेल."

मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील जनरल फिजिशिअन आणि इन्फेक्शन डिसीज स्पेशालिस्ट डॉ. हेमलता अरोरा म्हणाल्या, "लस घेतल्याने तयार होणाऱ्या अँटिबॉडीजमुळे कोव्हिड, गुंतागुंत, साइड इफेक्ट्स, रक्ताच्या गुठळ्या होणे आणि उपचारादरम्यान वा नंतर होणारा संसर्ग यापासून संरक्षण होते, त्यामुळे प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा आपण जी डीएनए लस घेतली, ती न घेता बूस्टर डोससाठी mRNA लसीच्या वापरासंदर्भात अभ्यास सुरू आहे. मिश्रण करणे बहुधा अधिक योग्य राहील, पण त्याचे काही साइड इफेक्ट्स असू शकतात. या संदर्भात भारतात अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे."

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या