देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिल्लीत मागच्या सहा दिवसात ६२८ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबत आजतकशी बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. यांनी सांगितले की, '' कोरोना व्हायरस विरुदध लढाईचा हा ११ वा महिला सुरू आहे. संपूर्ण जगभरात २५० पेक्षा जास्त कंपन्या कोरोनाची लस तयार करत आहेत. यातील ३० कंपन्यांचे भारताकडे लक्ष आहे. देशात पाच लसींच्या चाचण्या सुरू आहेत. २०२१ च्या सुरूवातीच्या तीन महिन्यात आपल्याला लस मिळू शकते. सप्टेंबरपर्यंत २५ ते ३० कोटी भारतीयांना लस दिली जाईल.''
पुढे त्यांनी सांगितले की, ''सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचारी, पोलीस पॅरामिलिट्री फोर्स या क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला लस दिली जाणार आहे. त्यानंतर ६५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आणि ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.''
दिलासादायक! भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे संभाव्य उपचार; उंदरांवरील चाचणी ठरली यशस्वी
''कोरोनाला रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती पसरवली जात आहे. नियमांचे पालन अनेक ठिकाणी सक्तीने केले जात आहे. आतापर्यंत ९० लाखांवर रुग्णांची संख्या गेली असून ८५ लाख रुग्ण बरे झाले आहेत. सगळ्यात चांगला रिकव्हरी रेट भारताचा आहे.'' काही शहरांमध्ये कोरोना प्रसाराची स्थिती ही खूप चिंताजनक आहे. आम्ही लोकांना कोरोनापासून बचावासाठी बेसिक प्रोटोकॉल्सचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. ३० जानेवारीला पहिला रुग्ण सापडल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून आमची टीम इतर ठिकाणी पोहोचली. '' असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.
आपातकालीन स्थितीत कोरोना लसीचा वापर सुरू होणार? कोरोनाच्या वाढत्या प्रसारानं वाढली चिंता
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितले की, ''राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी केंद्राने दखल घेतली आहे. आता पुन्हा कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय मोबाईल टेस्टिंग वॅनची सुद्धा व्यवस्था केली जात आहे. टेस्ट आणि ट्रेसिगद्वारे कोरोनाला रोखता येऊ शकतं. त्यासाठी त्वरित ट्रेसिंग करण्याची आवश्यकता आहे. दिल्लीतील प्रदूषण ही सगळ्यात मोठी समस्या आहे. लवकरच पंतप्रधान मोदी कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठकीत चर्चा करणार आहेत.''