शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Corona Vaccine : अलर्ट! लस घेतल्यानंतर, आधी काय करायचं काय नाही? सरकारनं दिल्या नव्या गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 12:40 PM

Corona Vaccine : अशा परिस्थितीत लस घेण्यापूर्वी व नंतर काय केले पाहिजे, याबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

भारतातील कोरोनाव्हायरस माहामारीच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे आणि त्यादरम्यान, लसीकरणाचे काम वेगाने केले जात आहे. तथापि, अद्याप लसीच्या दुष्परिणामांबद्दल अनेक शंका आहेत आणि लोक लसी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा परिस्थितीत लस घेण्यापूर्वी व नंतर काय केले पाहिजे, याबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

आधी लसीपासून एलर्जी उद्भवली असेल तर?

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड -१९ ची लस घेतल्यानंतर व्यक्तीला कोणत्याही लसीची एलर्जी झालीये का? हे जाणून घ्यायला  हवं. जर यापूर्वी असे घडले असेल तर त्या व्यक्तीस एलर्जी तज्ञाकडे पाठवावे. एखाद्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढे जावे.

आरोग्याची स्थिती कशी आहे हे माहीत करून घ्यायला हवं?

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लस उत्पादकांनी खबरदारी म्हणून सांगितलेल्या आरोग्याच्या स्थितीचा आढावा घ्यावा. यामध्ये गर्भधारणा, कमुकवत रोगप्रतिकारक प्रणाली आणि वृद्ध व्यक्तीं, कोणत्याही गंभीर आजाराचा समावेश आहे. या अटी असलेले लोक लसीकरणासाठी पात्र आहेत, परंतु त्यांना आवश्यक माहिती आणि सल्ला देण्यात यावा. 

सौम्य साईड इफेक्ट्स 

लस घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट्स दिसले, म्हणजेच लस शरीरात योग्य पद्धतीनं कार्यरत आहे. या दुष्परिणामांमध्ये हात दुखणे, सौम्य ताप, थकवा, डोकेदुखी, स्नायू किंवा सांध्यातील वेदना यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आरोग्याच्या परिस्थितीचे परीक्षण करून दुष्परिणामांची माहिती दिल्यानंतर ही लस घेतली जाऊ शकते.

लस घेतल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत मुल्यांकन

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लसीकरणानंतर ज्या व्यक्तीस लसी दिली गेली आहे त्याचे मूल्यांकन 15 मिनिटांसाठी केले पाहिजे. त्याच वेळी, ज्या कोणालाही लसीची एलर्जी आहे त्याचे कोरोना लस लागू झाल्यानंतर 30 मिनिटांसाठी मूल्यांकन केले पाहिजे. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला त्रास झाला या तर कुठे उपचार घ्यावेत हे माहीत असायला हवं.  लस घेल्यानंतर, त्या व्यक्तीस काही अनपेक्षित किंवा गंभीर प्रतिक्रिया जाणवल्यास किंवा एलर्जी असल्यास, ताबडतोब वैद्यकीय पर्यवेक्षकास त्याबद्दल कळवावे.

काय खायचं आणि काय नाही?

शरीराला  हायड्रेड ठेवणं महत्वाचं आहे. जर तुम्ही कोरोनाची लस घेण्याची तयारी करत असाल तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. अशा पदार्थाचे सेवन करा ज्यात पाणी आणि फायबर्सचं प्रमाण खूप असतं. कोरोनाची लस घेतल्यानंतर साईड इफेक्टसशी तीव्रता कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. 

ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार माहामारीच्या काळात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. जास्त कॅलरीजयुक्त आहार टाळून फायबर्स असलेल्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा. फायबर असलेल्या फळांचा किंवा ज्यूसचा आहारात समावेश करा. 

फायबर्सयुक्त आहारामुळे तुमची  रोगप्रतिकारकशक्ती चांगली  राहण्यास मदत होते. याशिवाय लस घेतल्यांतर पौष्टीक अन्न खायला हवं. ओट्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सयुक्त  पदार्थांचा आहारात समावेश करा. जर्नल ऑफ क्लिनिकल स्लीप मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार  सॅच्यूरेटेड फॅट्स आणि जास्त साखरयुक्त आहार घेण्यापासून वाचायला हवं. ताण, तणाव किंवा चिंता वाढल्यानं झोपेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

कोरोनाची लस घेण्याआधी काही  गोष्टींची काळजी घ्यायला हवी. डाएटच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाही.  कारण तुमचा आहार आणि जीवनशैली व्यवस्थित नसेल तर लसीचे साईड इफेक्ट्स तीव्रतेनं दिसू शकतात. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल दिलेल्या माहितीनुसार हायड्रेट राहण्यासाठी हेल्दी, संतुलित आहार आणि जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळे ताण तणावाच्या लक्षणांना कमी करता येऊ शकतं.   अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या