अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलायना येथील ड्यूक विद्यापीठाने ही लस विकसित केली आहे. अतिसूक्ष्म कणांद्वारे ही लस शरीरात प्रतिपिंडे न्यूट्रलाइज करण्यासाठी उद्युक्त करते. अतिसूक्ष्म कणांची रचना कोरोना विषाणूच्या भागांपासून तयार केलेली असते जी शरीराच्या सेल रिसेप्टर्सशी जोडलेली असते. ॲड्ज्युव्हलंट नामक रासायनिक उत्प्रेरकाने या सेल रिसेप्टर्सची रचना बनलेली असते.
लसीची वैशिष्ट्ये
- ‘पॅन-कोरोनाव्हायरस व्हॅक्सिन’ ही लस केवळ कोरोनाच्या सध्याच्या विषाणूवरच नव्हे तर कोरोनाच्या सार्स-कोव्ह-१ या मूळ विषाणूवरही प्रभावी ठरली
- तसेच ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांत आढळलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंट्सवरही ही लस रामबाण उपाय असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे
- माकड आणि उंदरांवर या लसीचे करण्यात आलेले प्रयोग यशस्वी ठरले आहेत
- वटवाघळांपासून संक्रमित होणाऱ्या विषाणूंवरही ही लस प्रभावी ठरल्याचे आढळून आले आहे
आव्हाने काय आहेत
- ‘पॅन-कोरोनाव्हायरस’ लसीची अजून माणसांवर चाचणी करण्यात आलेली नाही
- निरोगी स्वयंसेवकांना लसीच्या चाचण्यांसाठी तयार करून त्यांच्यावर या लसीचा अभ्यास करण्यात येईल
- या स्वयंसेवकांवर लसीचा काय परिणाम होतो, ते कसा प्रतिसाद देतात हे पाहिल्यानंतरच लसीच्या मंजुरीसाठी अर्ज करावा लागेल
- लसीच्या चाचण्या करणे हे सध्याचे मुख्य आव्हान आहे