शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

'मेड इन इंडिया' लस कधी लॉन्च होणार? भारत बायोटेक सांगितला कोरोना लसीचा 'हा' प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 5:51 PM

CoronaVirus News & Latest Updates : भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी मिळाल्यानंतर ही सर्वात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसन थैमान  घातलं आहे. काही देशात कोरोनाचा कहर इतका वाढला आहे. त्यामुळे फ्रान्स, जर्मनी, इटली यांसह इतर देशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे या भयानक माहामारीपासून बचाव करण्यासाठी लस कधी मिळणार याचीच सगळ्यांना प्रतिक्षा आहे. भारतातही स्वदेशी कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतानाच आता भारत बायोटेक कंपनीतील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी मिळाल्यानंतर ही सर्वात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

सध्या कंपनीचे उद्दिष्ट देशभरातील लसीची टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली आहे. २०२१ च्या सुरूवातीच्या तीन महिन्यात ही लस भारतातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशी माहिती भारत बायोटेककडून देण्यात आली आहे.

या लशीची चाचणी साधारण 14 राज्यांमध्ये 24 ते 25 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुरू आहे. प्रत्येक रुग्णालयात जवळपास 2000 स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी सध्या सुरू आहे. या लशीचं उत्पादन करण्यात आल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच सरकारी रुग्णालयांना औषध पुरवणाऱ्या दुकानांना किंवा कंपन्यांना या लशीचा पुरवठा करण्याबाबत विचार सुरू आहे. या लसीची किंमत किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती  स्पष्ट करण्यात आलेली नाही. भय इथले संपत नाही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; 'या' देशात पुन्हा महिनाभराचा लॉकडाऊन घोषित

सिरम इंस्टिट्यूची कोविशिल्ड लस कधी येणार?

आदर पूनावाला म्हणाले, "आम्ही पहिल्यांदा 100 दशलक्ष डोस देण्याच्या विचाराने काम करत आहोत. ते 2021 च्या Q2-Q3 पर्यंत उपलब्ध होईल." सिरम इन्स्टिट्यूट निर्मित ऑक्सफर्ड कोरोनाव्हायरस लशीच्या 100 दशलक्ष डोसचा पहिला भाग 2021 च्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत उपलब्ध होईल. ऑक्सफर्डची कोरोना लस अत्यंत स्वस्त आणि सगळ्यांना परवडणारी असेल. 

लसीकरणाबाबत बोलताना आदर पुनावाला यांनी सांगितले की,'' या वर्षाच्या शेवटापर्यंत  कोरोनाची लस  उपलब्ध होईल की नाही याबाबत मत मांडणं घाई करण्यासारखं ठरेल. चाचण्यांचे यश हे रोगप्रतिकारक शक्ती आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असते. जर आपतकालीन परवान्यासाठी अर्ज केला नाही तर आमची चाचणी जानेवारीपर्यंत संपली पाहिजे आणि त्यानंतर आम्ही यूकेतील चाचणी प्रक्रिया जानेवारीमध्ये भारतात दाखल करू शकतो. ''

पुढे त्यांनी सांगितले की, ''सध्या लसीची अडवांस चाचणी सुरू आहे. ब्रिटनने कोरोनाबाबत डेटा दिल्यास आपातकालीन स्थितीतील  चाचणीसाठी आरोग्य मंत्र्यांना निवेदन दिलं जाणार आहे. मंत्रालयातून मंजूरी मिळाल्यानंतर चाचण्या भारतात केल्या जाणार आहेत. जर  हे सगळं नियोजन  यशस्वी ठरले तर डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची लस उपलब्ध होऊ शकते.''पॉझिटिव्ह बातमी! देशात पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मासिक घट; ऑक्टोबरमध्ये घटली ३० % रुग्णसंख्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या