कोरोना लसीचे उत्पादन, निर्यात यांबाबत चीनसह अन्य देशांमध्ये हालचाली सुरू आहेत. सीएनएनच्या रिपोर्टनुसार कोरोना लसीचे कोट्यावधी डोस निर्यात करण्यासाठी चीनने तयारी केली आहे. आता लसीची निर्यात करण्यासाठी चीनला लस रेग्यूलेटरकडून मंजूरी मिळणं गरजेचं आहे. परदेशातील कोरोना लसीची निर्यात करण्यासाठी चीनने आंतरराष्ट्रीय विमानतळावर खास व्यवस्था केली आहे. या ठिकाणी कमी तापमानात लसीचे डोस साठवले जाणार आहेत. रिपोर्ट्सनुसार आता पुढच्या काही महिन्यात चीन अनेक देशांमध्ये आपल्या लसीचे वितरण सुरू करणार आहेत.
चीनच्या ४ कंपन्यांकडून ५ कोरोना लसीच्या चाचण्या सुरू आहेत. एकूण १६ देशांमध्ये चीनी कोरोना लसीचे परिक्षण सुरू आहे. सगळ्यात आधी चीन अशा देशात निर्यात करणार आहे, ज्या देशात लसीची चाचणी सुरू आहे. दरम्यान जगभरातील इतर देशात लसीचे वितरण करण्याचे आवाहन केलं आहे. यात अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे.
काळजी वाढली! फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस
चीनी कंपनी सिनोवॅक बायोटेकने ब्राजीलमध्ये ४ कोटी ६० लाख आणि तुर्कीमध्ये ५ कोटी डोस वितरण करण्यासाठी करार केला आहे. कॅनसिनो बायोलॉजिक्सने मॅक्सिकोमध्ये ३ कोटी ५० लाख डोस देण्यासाठी करार केला आहे. सिनोफार्म कंपनीने मागच्या काही महिन्यात दिलेल्या माहितीनुसार १२ देशांनी लस खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. २०२१ मध्ये १ अब्ज लसीचे उत्पादन केलं जाणार आहे.
दरम्यान अनेक देशांमध्ये कोरोना लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकताच कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भेट दिली. अशावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं होतं. कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना योद्ध्यांनाच प्रथम लस दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. जालन्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी असे सांगितले होते.
coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान
लस आल्यानंतर फ्रंटलाईन लोकप्रतिनिधींना देण्यात यावी, अशी मागणी झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. लस आल्यानंतर ती पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनाच देण्यात येईल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. कोरोना लस कुणाला द्यावी, त्याचं वर्गिकरण कसं व्हावं याचं संपूर्ण नियंत्रण केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे. नियमांनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असंही टोपे म्हणाले होते.