कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कारण कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाकातील स्प्रे किंवा इन्हेलर लसीपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकते. असा दावा ब्रिटनमधील संशोधकांच्या टीमने केला आहे. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी आणि इंपीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी दावा केला आहे की, श्वसनाच्या माध्यामातून होत असलेल्या संक्रमणापासून वाचण्यासाठी फुफ्फुसांपर्यंत औषधं पोहोचवणं सगळ्यात उत्तम उपाय ठरू शकतो. या दोन्ही युनिव्हर्सिटीमध्ये सध्या कोरोनाच्या लसीचे परिक्षण सुरू आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची लस शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. १० हजारांपेक्षा जास्त लोकांवर या लसीचे परिक्षण केले जाणार आहे. इंपीरियल कॉलेज लंडनच्या लसीच्या वैद्यकिय परिक्षणातील पहिल्या टप्प्यात कोणतेही दुष्परिमाण दिसून आले नाहीत. लसीमुळे नाकातील म्यूकस मेंमरेनची प्रतिकारकशक्ती प्रभावी करता शकते. शरीरातील श्वसनतंत्र आणि फुफ्फुसांवर जसे सुरक्षाकवच असते.
त्याचप्रमाणे नाकात आणि तोंडावरही असते. त्यामुळे व्हायरसला शरीरात प्रवेश करता येण्यापासून रोखता येऊ शकतं. नाकातून लस दिल्यामुळे म्युकस मेंमब्रेनला अलर्ट देता येऊ शकतो. जेणेकरून कोरोना व्हायरसला ओळखून आत जाण्यापासून रोखता येईल. नाकातून स्प्रेच्या स्वरूपातून ही लस द्यायला हवी. वयस्कर व्यक्तींसाठी ही लस जास्त परिणामकारक ठरू शकते.
प्रोफेसर रोबिन शेटॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार इनहेलर किंवा स्प्रेद्वारे दिली जाणारी लस वयस्कर लोकांसाठी जास्त परिणामकारक ठरू शकते. कारण तज्ज्ञांच्यामते वयस्कर माणसांना सुईच्या माध्यमातून लस दिल्यास परिणामकारक ठरणार नाही. कारण वयाप्रमाणेच रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा कमी होत जाते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुईने लस देण्याऐवजी स्प्रेच्या माध्यमातून दिल्यास फुफ्फुसांनी निरोगी ठेवता येऊ शकतं.
दरम्यान कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्रामध्ये काल कोरोनाच्या तब्बल ४ हजार ८४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात राज्यात झालेली रुग्णांची ही सर्वाधिक नोंद आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
CoronaVirus: रेल्वे स्टॉलवर आता मास्क, सॅनिटायझर, उशा, बेडरोल आणि टॉवेलही मिळणार