जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं टेन्शनही वाढलं आहे. लोकांना कोरोनापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला होता मात्र, चीन, जपान, अर्जेंटिना, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्राझील यां सारख्या देशांमध्ये पुन्हा एकदा रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या आरोग्य मंत्रालयानेही एक बैठक बोलावली होती, यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. चीनमधील कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्यास जबाबदार असलेल्या ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरिअंटचे चार रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. गुजरातमध्ये कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या 61 वर्षीय एनआरआय महिलेने लसीचे तीन डोस घेतले होते.
कोरोना व्हायरस सातत्याने म्यूटेट होत आहे. यामुळे त्याची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरण झालेले लोकही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. खरे तर, अशी अनेक लक्षणे आहेत ज्यांकडे कुणीही मनुष्य सहजपणे दुर्लक्ष करू शकतो. मात्र ती लक्षणे कोरोनाचीही असू शकतात. हेल्थ स्टडी ZOE ने कोरोनाच्या नव्या लक्षणांसंदर्भात माहिती दिली आहे.
हेल्थ स्टडी ZOE ने रुग्णांच्या आधारे सागितली लक्षणं -Express.co.uk नुसार, कोरोना सुरू झाल्यापासूनच ZOE तो वेळे नुसार कशापद्धतीने लक्षने बदलत आहेत, यासंदर्भात सातत्याने माहिती देत आहे. COVID-19 चे कारण बनणारा SARS-CoV-2 कोरोना व्हायरस, हा परण्याची क्षमता आणि त्याच्या लक्षणांमुळे म्यूटेट होत आहे. असे या रिसर्चमधून समोर येते. खाली सांगण्यात आलेली कोविड-19 ची लक्षणे सर्वसामान्य आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही परिस्थितीत दूर्लक्ष करता कामा नये.
कोरोनाची लक्षणे -- घसा खवखवणे- शिंकणे येणे- वाहते नाक- चोंदलेले नाक- कफ नसलेला खोकला- डोकेदुखी- कफ आणि खोकला- बोलण्यात अडचण- स्नायू दुखी- वास न येणे- उच्च ताप- थंडी-ताप- सतत्याने खोकला येणे - श्वासोच्छवासाचा त्रास- थकवा जाणवणे- भूक न लागणे- अतिसार- आजारी पडणे