सोशल मीडियावर कोरोना व्हायरसशी निगडीत अनेक चर्चा सुरू आहेत. गरमीचं वातावरण झाल्यानंतर किंवा तापमानात वाढ झाल्यानंतर कोरोना व्हायरस कमी नष्ट होईल. उन्हाळ्याच्या दिवसात कोरोना व्हायरसचा धोका उद्भवणार नाही. अशा चर्चा लोकांमध्ये रंगल्या आहेत.पण तज्ञांच्यामते या गरमी आल्यामुळे खरचं कोरोनाचा धोका कमी होईल का याचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. यावर आधारित अनेक रिसर्च सध्या सुरू आहेत.
सामान्यपणे कोणताही व्हायरस सामान्य तापमानात खूप सक्रिय असतात. खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड वातावरणात व्हायरस हा सुस्त पडत असतो. तापमान वाढल्यानंतर ते स्वतःला झाकून घेतात. आणि निष्क्रिय होतात. याऊलट जर अनुकूल वातावरण त्यांना मिळालं तर सक्रिय होतात आणि आपली संख्या वाढवतात. असा अनेकांचा समज आहे. ( हे पण वाचा- Corona virus : ऑनलाईन शॉपिंग, नको रे बाबा! त्यामुळे होऊ शकतो कोरोना...)
थायलंडमध्ये आणि सिंगापूरमध्ये १५ दिवसांत तापमान कमाल २६ ते २७ डिग्री ते ३७ डिग्रीपर्यंत होते. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी कोरोनाटचे रुग्ण आढळले. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाचे तब्बल ११ रुग्ण समोर आले. आता ही संख्या ७० वर पोहोचली आहे. ( हे पण वाचा-रोगप्रतिकारकशक्ती वाढवून इन्फेक्शनला दूर ठेवेल लसणाची चविष्ट चटणी....)