जगभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ४ लाखांपर्यंत पोहोचला आहे. भारतात सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला बाहेर पडता येणार नाही. जे काय करायचं ते फक्त चार भीतींच्या आत. पण बाहेर पडण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक शारिरीक आणि मानसिक आजारांचे शिकार होत आहेत. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकता.
आपल्या मित्रमैत्रिणींशी बोला
सतत घरात राहिल्यामुळे स्ट्रेस येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण जर तुम्हाला वर्क फॉर्म होमचं जास्त प्रेशर येत असेल तर आपली स्ट्रेस लेवल कमी करण्याासाठी मित्र-मैत्रिणींशी बोला. दोन-तीन फ्रेंड्स मिळून तुम्ही व्हिडीओ कॉलद्वारे बोलू शकता.
गाणी ऐका, पुस्तक वाचा
तुम्हाला जास्त कंटाळा येत असेल तर गाणी ऐका. किंवा तुम्हाला आवडत असलेल्या विषयाशी निगडीत पुस्तक वाचा. तुम्ही तुमचा छंद सुद्धा जोपासू शकता. त्यासाठी नवीन आईडिया शोधण्याचा प्रयत्न करा. तसंच ऑनलाईन कोर्समधून तुम्ही विनामुल्य एखाद्या विषयांचं ज्ञान घेऊ शकता. ( Coronavirus: ‘लॉकडाऊन’मध्ये ‘ही’ ३० मिनिटे आयुष्यासाठी महत्त्वाची; WHO नं दिला मोलाचा सल्ला!)
व्यायाम करा
तुमचा विश्वास बसणार नाही पण व्यायाम केल्याने मुड खुप चांगला राहतो. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा बॉडी टोन हवी असेल तर तुम्ही या वेळेचा चांगला उपयोग करून घेऊ शकता. कारण व्यायम केल्यानंतर फरक दिसून येण्यासाठी चांगली झोप आणि वेळेच्या वेळी आहार घ्यावा लागतो. लॉकडाऊनमध्ये तुम्ही योग्य पध्दतीने या सगळ्या गोष्टी करू शकता. यु-ट्यूबवर पाहून तुम्ही व्यायाम करण्याचे वेगवेगळे प्रकार शिकू शकता. ( हे पण वाचा-रोज फक्त अर्धा चमचा 'हे' तेल वापरून हार्ट अटॅकला ठेवा दूर...)