जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ५ हजार लोकांचा जीव गेला आहे. लाखो रूग्ण संक्रमित झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोक मास्क आणि हॅंड सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. मेडिकल स्टोरमध्ये मास्क आणि हॅंड सॅनिटायजरचा तुटवडा जाणवत आहे. ज्यांच्याकडे सॅनिटायजर आहे ते अधिक किंमतीत विकत आहेत. डॉक्टर सुरक्षेसाठी सतत हात धुण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे सॅनिटायजरचा वापर वाढला आहे. पण सॅनिटायजर मिळत नसेल तर घाबरण्याची गरज नाही. कारण तुम्ही हॅंड सॅनिटायजर घरीही तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला घरीच सॅनिटायजर तयार करण्याची आयडिया सांगणार आहोत.
काय काय लागेल?
आयसोप्रोपिल अल्कोहोल
अॅलोव्हेरा जेल
टी ट्री ऑइल
कसं कराल तयार?
एक भाग अॅलोव्हेरा जेलमध्ये तीन भाग आइसोप्रोपिल अल्कोहोल मिश्रित करा. सुगंधासाठी यात काही थेंब टी ट्री ऑइलचे टाका. तुमचं जेल वापरण्यासाठी तयार आहे.
(Image Credit : houstonchronicle.com)
हॅंड सॅनिटायजर स्प्रे कसं तयार कराल?
आइसोप्रोपिल अल्कोहोल
ग्लिसरोल
हाइड्रोजन पेरॉक्साइड
डिस्टिल्ड वॉटर
स्प्रे बॉटल
दीड कप अल्कोहोलमध्ये दोन चमचे ग्लिसरोल मिश्रित करा. तुम्ही ग्लिसरोल ऑनलाइन खरेदी करू शकता. ग्लिसरोल फार गरजेचं आहे कारण याच्या वापराने लिक्विड चांगल्याप्रकारे मिश्रित होतं. यात एक चमचा हायड्रोजन पॅरॉक्साइड, एक चतुर्थांश डिस्टिल्ड वॉटर मिश्रित करा.
आता हे मिश्रित स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे जेल नाही तर स्प्रे आहे. याला सुगंधित करण्यासाठी यात एसेंशिअल ऑइलही मिश्रित करू शकता.काय काळजी घ्याल?
हॅंड सॅनिटायजर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जसे की, ज्या वस्तूंचा वापर लिक्विड मिश्रित करण्यासाठी कराल त्या वस्तू स्वच्छ असाव्या.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, मिश्रणानंतर लिक्विड कमीत कमी ७२ तास तसंच ठेवावं. जेणेकरून मिश्रण करताना काही बॅक्टेरिया तयार झाले तर ते मरतात.
सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशननुसार, सॅनिटायजर प्रभावी करण्यासाठी यात कमीत कमी ६० टक्के अल्कोहोल असावं. ९९ टक्के आयसोप्रोपिल अल्कोहोल असलेलं मिश्रण वापरणं कधीही चांगलं असतं. प्यायल्या जाणाऱ्या दारूत म्हणजे व्हिस्की, व्होडका इत्यादी अल्कोहोल प्रभावी ठरत नाही.