वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO च्या एका रिपोर्टनुसार, जगभरात साधारण 400 मिलियनपेक्षा जास्त लोक डायबिटीसने पीडित आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढत असताना डायबिटीसच्या रूग्णांसाठी काही महत्वाच्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.
या गाइडलाईन्स WHO ने जारी केल्या आहेत. ज्यात डायबिटीसच्या रूग्णांना कोरोना व्हायरसपासून बचावासाठी काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. साधारणपणे असं पाहिलं गेलं आहे की, एखाद्या आजाराने पीडित असलेल्या लोकांना वेगाने संक्रमण होतं आणि त्यांना इतरही समस्या होतात. त्यामुळे अशा लोकांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका
भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता गर्दीची काही ठिकाणे सध्या बंद करण्यात आली आहेत. पण तरी सुद्धा अशी काही ठिकाणे आहेत जिथे अनेक लोक एकत्र येतात. डायबिटीसच्या रूग्णांना अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण डायबिटीसच्या रूग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते. आणि त्यामुळे व्हायरसचं संक्रमण सहजपणे होऊ शकतं.
लोकांना भेटू नका
डायबिटीसच्या रूग्णांनी कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असताना सध्या काही दिवस लोकांना भेटणं टाळलं पाहिजे. मुळात डायबिटीसने पीडित रूग्णांना कोणत्याही प्रकारचं संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. अशात जर ते कोरोनाने पीडित व्यक्तीच्या संपर्कात आले तर त्यांनाही याची लागण होऊ शकते.
ब्लड शुगर लेव्हल चेक करत रहा
डायबिटीसच्या रूग्णांनी तसं तर नियमित त्यांची ब्लड शुगर चेक करायला पाहिजे. जेणेकरून काही समस्या होऊ नये. दरम्यान आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावातही डॉक्टरांनी हा सल्ला दिला आहे की, डायबिटीसच्या रूग्णांनी वेळोवेळी त्यांची ब्लड शुगर लेव्हल चेक केली पाहिजे. हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे इम्यून सिस्टीम कमजोर होऊ शकते. इम्यून सिस्टीम कमजोर झाली तर त्यांना कोरोनाची लागण सहजपणे होऊ शकते. त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वेळोवेळी चेक करावी.
ब्लड शुगर चेक करायच्या मशीनची स्वच्छता
ब्लड शुगर चेक करण्याच्या मशीनचा प्रयोग जर डायबिटीस रूग्ण स्वत: करत असतील किंवा घरातील कुणी सदस्य करत असेल तर नियमित ती मशीन स्वच्छ करावी. सॅनिटायजरच्या काही थेंबांनी तुम्ही ही मशीन स्वच्छ करू शकता. याने हा फायदा होईल की, मशीनवर कोणत्याही प्रकारचा व्हायरस राहणार नाही. सॅनिटायजरने मशीन स्वच्छ केली तर संक्रमणाचा धोका कमी होतो.
या गोष्टींचीही काळजी घ्यावी
डायबिटीसच्या रूग्णांना कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जेवढ्या सूचना दिल्या आहेत त्या त्यांनी फॉलो कराव्यात. हातांची स्वच्छता करावी, मास्कचा वापर करावा आणि प्रॉपर हायजीनची काळजी घ्यावी. असं करून डायबिटीसचे रूग्ण कोरोनापासून बचाव करू शकतील. सोबत वर सांगितलेल्या गोष्टींचीही काळजी घ्यावी.