संपूर्ण जगाने कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना केला आहे. लाखो लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली. तर अनेकांना आपला जीव देखील यामुळे गमवावा लागला. कोरोनावर लाखो लोकांनी मात देखील केली होती. मात्र कोरोनातून बरं झाल्यावर देखील कोरोना काही पाठ सोडत नाही. त्याच्यापासून सुटका झालेली नाही. लाँग कोविडचा सामना करावा लागत आहे. रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा झाला आहे.
'द लॅन्सेट'च्या रिपोर्टनुसार, लाँग कोविडने ग्रस्त असलेल्या रुग्णांना अनेक आजारांचा धोका असतो. 'यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' (CDC) लाँग कोविड असल्यास शरीरावर अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. थकवा येतो, व्यायामानंतर ऊर्जेची कमतरता जाणवते, खोकलाही येतो.
सीडीसीच्या रिपोर्टनुसार, अलीकडेच 6.8% अमेरिकन लोकांमध्ये लाँग कोविडची लक्षणं दिसून आली आहेत, 17.6 टक्के लोक लाँग कोविडचे शिकार होत आहेत. लाँग कोविडमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात.
'द असोसिएशन ऑफ पोस्ट-कोविड-19 कंडिशन सिंपटॉम्स अँड एम्प्लॉयमेंट स्टेटस' या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे दीर्घकाळ ग्रस्त असलेले लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत होण्याची शक्यता 15 पटीने जास्त असते. भारतात कोविडची प्रकरणं वाढत आहेत. जे लोक लाँग कोविडने त्रस्त आहेत त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नेटवर्क 18 मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कोरोना लस आणि फ्लू लस एकत्रितपणे घेणं पूर्णपणे सुरक्षित आहे. जो कोणी या दोन लसी एकत्र घेतो. तो दोन्ही आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. या दोन्ही लसी घेतल्याने शरीरावर पूर्ण परिणाम होईल.
सध्या हवामान दिवसेंदिवस बिघडत आहे, कधी पाऊस पडेल, कधी ऊन पडेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत, ही फ्लू लस सर्व प्रकारच्या विषाणूजन्य आजारांपासून आपले संरक्षण करेल. बदलत्या हवामानात कोरोनाचा प्रसारही झपाट्याने होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोना लसही फायदेशीर ठरेल.