कोरोनाची लस हा रामबाण उपाय असला तरी सध्या जागतिक स्तरावर कोरोनाच्या लसीचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाची लस मिळवण्याठी लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही अजूनही देशभरातील सगळ्या लोकसंख्येला लस देणं कठीण ठरणार आहे. अशातच पश्चिम बंगालच्या एका १२ वी इयत्तेत शिकत असलेल्या दिगांतिका नावाच्या मुलीनं कोरोनाच्या उपचारांबाबत दिलासादायक माहिती दिली आहे. सध्या वैज्ञानिक पातळीवर ही बाब तपासण्यात आलेली नाही. (West Bengal girl digantika bose created a mask to fight covid 19 )
या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार लस घेण्यासाठी आता लसीकरण केंद्रावर जाण्याची काहीच गरज नाही. कारण तिनं कोरोनाला नष्ट करणारा मास्क शोधला आहे. विशेष म्हणजे 'किल द कोरोनावायरस' असं नाव या मास्कला मुलीनं दिलं आहे. खास बनावटीचा हा मास्क मुंबईतल्या गुगल्स म्युझियम ऑफ डिझाइन एक्सलन्समध्ये दाखवला जाणार आहे.
कशी आहे मास्कची रचना?
तीन चेंबर्सचा हा मास्क असून पहिल्या चेंबरमध्ये आयन तयार होतात. त्यामुळे हवेतील धूळ कचरा नाहीसा होऊन स्वच्छ हवा मिळू शकते. चेंबरमधलं पाणी आणि साबणाचं मिश्रणच कोरोनाचा कर्दनकाळ ठरेल असं तिचं म्हणणं आहे.
अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
तिनं दिलेल्या माहितीनुसार कोरोना २ चेंबरमधून कोरोना डिटेक्ट झाला नाही तरी तिसऱ्या चेंबरमधलं हे साबणाचं पाणी कोरोनाला नाकात जाण्यापूर्वीच नष्ट करेल. साबणाच्या पाण्याने पुन्हा पुन्हा हात धूत राहा असं डॉक्टर आणि वैज्ञानिक पहिल्यापासून सांगत आले आहेत. याचाच आधार घेत त्यानंतर हा मास्क तयार करण्यात आला आहे.
स्मोकिंग करणारे आणि शाकाहारी लोक कोरोनापासून अधिक सुरक्षित? जाणून घ्या सत्य
कोरोना संक्रमित व्यक्तीनं मास्क घातला तर त्याच्या नाकातून बाहेर पडणाऱ्या हवेतला कोरोना तिसऱ्या चेंबरमध्ये म्हणजेच नाकापासून पहिल्याच चेंबरमध्ये तो संपून जाईल आणि कोरोना प्रसार वाढणार नाही. पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून तिनं हा प्रयत्न केला आहे. हा मास्क कोरोनाला रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो असं तज्ज्ञाचे मत आहे.