कोरोना व्हायरसचा कहर काही संपताना दिसत नाही. एकामागून एक येणाऱ्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. आता आणखी एक नवीन व्हेरिएंट XEC युरोपमध्ये वेगाने पसरत आहे. जून २०२४ मध्ये जर्मनीमध्ये पहिल्यांदा सापडला होता, जो आतापर्यंत १३ हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. नवीन स्ट्रेन Omicron, KS.1.1 आणि KP.3.3 या दोन सब व्हेरिएंटचं एक रुप असल्याचं म्हटलं आहे.
KS.1.1 हा FLiRT व्हेरिएंट आहे, जो जगातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार मानला जातो. अशा परिस्थितीत, कोरोनाचे नवीन व्हेरिएंट भारतासाठी किती धोकादायक असू शकतात हे जाणून घेऊया. याबाबत कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊया...
कोरोनाचा XEC व्हेरिएंट काय आहे?
XEC व्हेरिएंट हा Omicron व्हेरिएंटमधील KS.1.1 आणि KP.3.3 या दोन सब-व्हेरिएंटचं संयोजन असल्याचं म्हटलं जातं. दोन्ही सब व्हेरिएंट आधीच जगासाठी चिंतेचं कारण बनले आहेत, परंतु दोघांच्या संयोजनामुळे नवीन व्हेरिएंटचा जन्म होऊ शकतो जो अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असू शकतो.
कोरोना XEC व्हेरिएंट किती धोकादायक?
XEC व्हेरिएंट किती धोकादायक आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु शास्त्रज्ञ निश्चितपणे याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. तो अधिक संसर्गजन्य होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास त्याचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. याशिवाय याबद्दल कोणतीही माहिती नाही पण त्यामुळे वेगाने अनेक गंभीर आजार होऊ शकतात असं सांगितलं जात आहे.
XEC व्हेरिएंटसाठी कोणती खबरदारी घ्यावी?
कोरोनाच्या XEC व्हेरिएंटबाबत तज्ञांचं म्हणणं आहे की, लोकांनी लसीकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. याला रोखण्याचा हा एकमेव मार्ग आहे. याशिवाय योग्य ती खबरदारी घ्या. जसं की, गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, योग्य अंतर ठेवा, स्वच्छतेची काळजी घ्या. यामुळे व्हायरसचा प्रसार रोखता येतो.
कोरोनाचे XEC व्हेरिएंट नक्की काय आहे?
- हा व्हेरिएंट Omicron शी संबंधित आहे आणि युरोप, उत्तर अमेरिका, आशियामध्ये वेगाने पसरत आहे.
- तज्ञ म्हणतात की, काही नवीन म्यूटेशन XEC सह येतात, जे या हंगामात पसरू शकतात. लसीकरणाद्वारे हे टाळता येऊ शकते.
- नवीन व्हेरिएंटची लक्षणं सर्दी आणि इन्फ्लूएंझा यांसारख्या सामान्य आजारांसारखी असू शकतात.
- लोक या व्हायरसच्या हल्ल्यातून एक किंवा दोन आठवड्यांत बरे होऊ शकतात. काही लोकांना बरं होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं.
- युके NHS म्हणते की, नवीन व्हेरिएंटमुळे फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात. यामध्ये खूप ताप येणे, थरथरणे, सततचा खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा, अंगदुखी, भूक न लागणे यांचा समावेश होतो.