शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Corona Virus : भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट; ब्रिटनमध्ये AY.4.2 व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 1:28 PM

Corona Virus : भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसची 14,623 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

नवी दिल्ली : भारतामध्ये सध्या कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टाचा नवीन व्हेरिएंट AY.4.2 ने चिंता वाढवली आहे. या नवीन व्हेरिएंटमुळे ब्रिटनमध्ये अनेक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे येथिल परिस्थिती गंभीर बनली आहे. ब्रिटनमध्ये मार्चनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. (Corona Virus Update Relief In India New Variant Britain Highest Daily Covid Death Toll Since Early March)

मंगळवारी ब्रिटनमध्ये कोरोनामुळे 223 मृत्यू झाले. यापूर्वी मार्च 2021 मध्ये 231 मृत्यू झाले होते. कोरोनाच्या AY.4.2 व्हेरिएंटमुळे ब्रिटनमधील लोकांची चिंता वाढली आहे, कारण गेल्या सोमवारी याठिकाणी कोरोनाची 49,156 प्रकरणे नोंदवली गेली. जुलैनंतरचा कोरोना रुग्णसंख्येचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. या व्हेरिएंटवर निरीक्षण ठेवले असून त्याचे मूल्यांकन केले जात आहे, असे ब्रिटनच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरोग्य सुरक्षा यंत्रणेने सांगितले की, 'डेल्टाच्या नवीन व्हेरिएंटवर नियमितपणे नजर ठेवली जात आहे. नुकताच समोर आलेला हा कोरोना डेल्टाचा  AY.4.2 व्हेरिएंट  आहे. याशिवाय, डेल्टाच्या E484K आणि E484Q व्हेरिएंटशी संबंधित काही नवीन प्रकरणे देखील समोर येत आहेत.

भारतात कोरोना रुग्णांमध्ये होतेय घटभारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसची 14,623 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 19,446 बरे झाले आणि 197 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत भारतात कोरोनाची 3,41,08,996 प्रकरणे समोर आली आहेत. तर अॅक्टिव्ह प्रकरणे 1,78,098 आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत भारतात 4.52 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे की, अॅक्टिव्ह प्रकरणे अडीच लाखांवर आली आहेत. तसेच, देशात कोरोनाचे आर मूल्य देखील 1 पेक्षा कमी आहे.

दरम्यान, AY.4.2 कोरोना व्हेरिएंटला अद्याप व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (VOC) किंवा व्हेरिएंट ऑफ इन्व्हेस्टिगेशन (VOI) मानले गेले नाही. हा व्हेरिएंट आधी जुलै 2021 मध्ये समोर आला होता. डेल्टा व्हेरिएंटच्या या नवीन व्हेरिएंटमध्ये काही नवीन म्यूटेशन आहेत, जे स्पाइक प्रोटीनवर परिणाम करतात.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडIndiaभारत