कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे चीनसह जगभरात माणसं मरायला सुरूवात झाली आहे. कोरोना व्हायरसने आत्तापर्यंत अनेकांचे बळी घेतले. यामुळेच जगातील सर्वच शास्त्रज्ञ कोरोनावर लस आणि औषध कसं शोधता येईल यावर अधिक भर देत आहे. यासंबंधित अनेक रिसर्च समोर आले आहेत. दरम्यान जपानच्या एका फार्मा कंपनीने औषध तयार करण्याचा दावा केला आहे.
जपानची कंपनी टाकेडा फार्मा अनेक दिवसांपासून कोरोनाचं औषध तयार करण्याासाठी प्रयत्नरत होती. या कंपनीने कोरोनापाासून रिकव्हर झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा एंटीबॉडीजपासून औषध तयार केलं आहे. या कंपनीच्या रिसर्चकर्त्यांचा असा दावा आहे की कोरोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णांसाठी हे औषध प्रभावशाली ठरणार आहे.
कोरोनापासून रिकव्हर झालेल्या रुग्णांच्या शरीरातून काढलेले एंटीबॉडीज नवीन कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीत सुधारणा घडवून आणेल. असं रिसर्च कर्त्यांचे मत आहे. रुग्णांच्या शरीरात असलेली रोगप्रतिकारकशक्ती एंटीबॉडी वाढवतात आणि आयुष्यभर त्याच स्थितीत ठेवत असतात. एंटीबॉडीज या रक्तातील प्लाझ्मामध्ये असतात.
ब्लड प्लाझ्मामध्ये असलेले एंटीबॉडीजला औषधात रुपांतर करण्याासाठी ब्लड प्लाज्माला वेगळं केलं जातं. त्यानंतर एंटीबॉडीज वेगळ्या काढल्या जातात. या थेरेपीला प्लाझ्मा डेराईव्ह थेरेपी असं म्हणतात. रुग्णांच्या शरीरात रोगांपासून लढण्याची क्षमता वाढवतात. WHO च्या मते व्हायरसपासून बचाव करण्याासाठी हा योग्य उपाय आहे. ज्यामुळे रुग्णांची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. त्यांनी असंही सांगितलं की हा प्रयोग यशस्वी झाला नाही असं सुद्धा होऊ शकतं. म्हणून सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-Coronavirus: ‘वर्क फ्रॉम होम’ ठरतंय कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी; तुम्हालाही जाणवतोय का ‘हा’ त्रास?)
जपानी फार्मा कंपनी टाकेडाने या आधी सुद्धा इंटरवेनस इम्युनोग्लोबिन नावाचे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे औषध तयार केले होते. कोरोनाच्या औषधाच्या बाबतीत हा उपाय सुरक्षित आहे आणि त्यामुळे कोणत्याही व्हायरसचा धोका उद्भवणार नाही असा दावा केला आहे. ( हे पण वाचा- Coronvirus : लक्षणं न दिसताही होऊ शकतो कोरोना; 'त्या' आकडेवारीनं धोका वाढला)