कोरोना व्हायरसची प्रभावी लस मिळण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. कारण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनतील शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी केलेल्या विधानामुळे संपूर्ण जगभराच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी अजून २ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. कारण २०२२ च्या आधी कोरोनाची लस मिळणं कठीण आहे.
स्वामीनाथन यांनी पुढे सांगितले की, ''जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवॅक्स या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या देशात लस पुरवण्याचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत करोडो डोज तयार करावे लागतील. म्हणजेच या उपक्रमाशी जोडलेल्या १७० देशांच्या अर्थव्यवस्थांना या उपक्रमातून नक्की काहीतरी मिळवता येईल. जोपर्यंत लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत नाही तोपर्यंत मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगच्या गरजा बदलण्यासाठी कमीत संख्येत डोस उपलब्ध असतील. २०२१ च्या शेवटापर्यंत जवळपास दोन कोटी डोज तयार करण्याचं उद्दीष्ट ठेवलं जाणार आहे.''
''पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात लस येईल आणि माणसं आधीसारखं जीवन जगायला सुरूवात करतील असं अनेकांना वाटत आहे. पण प्रत्यक्षात असं नसून पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत लसीचं उत्पादन करून मुल्यांकन केलं जाईल. २०२१ च्या सुरूवातीला लसीचे परिणाम दिसायला सुरूवात होईल. जगभरातील सुरू असलेल्या लसीच्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी जवळपास १२ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यावेळी लसीच्या साईड इफेक्ट्सं प्रमाण कमी झालेलं असेल. कोरोनाच्या लसीबाबत सगळ्यात आधी सुरक्षिततेचा विचार करणं गरजेचं आहे. अमेरिकेतील FDA (फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन) कडून लवकरच लसीच्या आपातकालिन स्थितीतील वापराबाबत गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत. '' असंही त्या यावेळी म्हणाल्या.
एका रिपोर्टनुसार चीनमध्ये आपातकालीन स्थितीत लस द्यायला सुरूवात केली आहे. आतापर्यंत लाखो लोकांचे लसीकरण झाल्याचेही समोर आलं आहे. याबाबत चीन आक्रमकतेने पुढे सरसावत आहे. 'चाइनीज सेंटर फॉर डिसीज एंड प्रीवेंशन'चे तज्ज्ञ वू गिजेन यांनी मंगळावारी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत चीनला स्थानिक पातळीवर लस विकसीत करण्याची परवागनी मिळालेली असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही लस चार आठवड्यांच्या आत येऊ शकतं असा दावा केला आहे.
भारतात ऑक्सफोर्ड लसीच्या चाचणीला पुन्हा सुरुवात होणार; DCGI चा हिरवा कंदील
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एक्स्ट्राजेनेका यांच्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी काही दिवसांपूर्वी भारतातही थांबवण्यात आली होती. दरम्यान या लसीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडीयाचे डॉ. वीजी सोमानी यांनी मंगळवारी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीयाला ऑक्सफोर्डची लसीच्या चाचण्या पुन्हा सुरू करण्यासाासाठी परवानगी दिली आहे.
याशिवाय DCGI ने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी नवीन स्वयंसेवकांना निवडण्यासाठीही बंदी घातली होती. आता ही बंदी उठवण्यात आली आहे. याआधी ११ सप्टेंबरला DCGI नं भारतातील पुण्यात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीयाच्या एक्स्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्डकडून घेण्यात येत असलेल्या चाचण्यांवर बंदी घातली होती. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं पुढील सूचना येईपर्यंत चाचण्या बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ही चाचणी सोखण्यात आली होती.
ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी आणि एस्ट्राजेनेका पीएलसीकडून विकसीत करण्यात आलेल्या या लसीचे सुरूवातीचे परिणाम खूपच उत्साहजनक होते. ब्रिटनमध्ये चाचणीदरम्यान डोस दिल्यानंतर एका महिला स्वयंसेवकांच्या शरीरात साईड इफेक्ट्स दिसून आले. म्हणून चाचणी थांबवण्यात आली होती. सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितले होते. की, भारतातल्या लसीच्या चाचणीवर याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यानंतर DCGI नं भारतातील पुण्यातली सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला नोटिस दिल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात चाचणी रोखण्यात आली.
भारतात ऑक्सफोर्ड लसीची चाचणी १७ ठिकाणी सुरु असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी करार करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील लसची चाचणी अमेरिका, ब्राझील, दक्षिण अमेरिका आणि भारतात सुरू होणार आहे.
हे पण वाचा-
अरे व्वा! भारतात ऑक्सफोर्ड लसीच्या चाचणीला पुन्हा सुरुवात होणार; DCGI चा हिरवा कंदील
'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा
अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा