कोविड-19 टास्क (Covid-19 Task Force) फोर्सच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी म्हटलं की जर कोरोनाचा नवा व्हेरिएंट (New Variant of Coronavirus) आला तर या व्हायरसची पुढची लाट ६ ते ८ महिन्यांमध्ये येऊ शकते. यासोबतच त्यांनी असाही दावा केला आहे की जरी ओमायक्रॉनचा सब -व्हेरिएंट BA.2, BA.1 च्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असला तरी तो संभाव्य आगामी लाटेचं कारण ठरणार नाही (New Wave of Coronavirus).
ते पुढे म्हणाले, की तेव्हार्यंत आपण ओमायक्रॉनच्या शेवटच्या टप्प्यात असू. मात्र आपण हेदेखील लक्षात ठेवायला हवं की हा विषाणू आपल्या आसपासच असून त्यापासून वाचण्यासाठी प्रत्येक शक्य असलेला प्रयत्न करायला हवा. ओमायक्रॉन BA.2 मुळे आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे का? याबद्दल बोलताना कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्याने म्हटलं की BA.2 त्या लोकांना संक्रमित करू शकत नाही, ज्यांना आधीपासूनच कोविडच्या BA.1 सब व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता.
डॉ. जयदेवन यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितलं की ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट BA.2 मुळे आणखी एक लाट येणार नाही. बीए.२ व्हेरिएंट त्या लोकांना संक्रमित करू शकत नाही जे बीए १ ची लागण होऊन बरे झाले आहेत. हा एखादा नवीन व्हायरस किंवा स्ट्रेन नाही. तर बीए.२ हा ओमायक्रॉनचाच एक सब-व्हेरिएंट आहे.
डॉ. जयदेवन म्हणाले की ओमिक्रॉन प्रमाणेच भविष्यातील कोरोना प्रकार देखील लस रोगप्रतिकारक गुणधर्म दर्शवू शकतात. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणू आपली ताकद वाढवण्यासाठी सतत विकसित होत आहे. यामुळे याची अधिक लोकांना संक्रमित करण्याची आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि लसीकरण प्रतिकारशक्तीला पराभूत करण्याची क्षमता आहे.