शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

CoronaVaccine: कोव्हॅक्सीन अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली, डबल म्यूटेंटचाही करू शकते सामना, ICMRचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 3:39 PM

केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने भारत बायोटेक कम्पनीला 65 कोटी रुपयांची मदत अनुदानाच्या स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. (Covaxin)

नवी दिल्ली - देशात कोरोना स्क्रमितांचा आकडा रोजच्या रोज नवा विक्रम करत आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी देशात लसीकरण अभियानही वेगात सुरू आहे. देशात आतापर्यंत 13 कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना लशीचा डोस देण्यात आला आहे. यातच आता कोव्हॅक्सीनसंदर्भात मोठे वृत्त आले आहे. कोरोना व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन ही अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली आहे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आपल्या रिसर्चमध्ये म्हटले आहे.  (CoronaVaccine: Covaxin is effective on most variants of corona says icmr)

CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या

कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएन्टचा सामना करण्याची क्षमता -आयसीएमआरने आपल्या संशोधनात दावा केला आहे, की कोव्हॅक्सीन कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएन्टचा सामना करू शकते. एवढेच नाही, तर  ही व्हॅक्सीन कोरोनाच्या डबल म्यूटेंट स्ट्रेनचाही सामना करण्यात सक्षम आहे, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सीन (COVAXIN) नावाची लस ही आतापर्यंत स्वदेशात तायर झालेली एकमेव लस आहे.

मोदी सरकार लशीच्या उत्पादनाची क्षमता वाढवणार - भारतातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आता या स्वदेशी लशीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पाऊल उचलले आहे. आत्मनिर्भर भारत मिशन 3.0 अंतर्गत चालविण्यात येत असलेले 'मिशन कोविड सुरक्षा'च्या माध्यमाने भारतात तयार झालेल्या लशीचा विकासात आणि उत्पादनात तेजी आणण्यासाठी मदत देण्यासंदर्भातील तरतूद करण्यात आली आहे. 

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

या अंतर्गत केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने भारत बायोटेक कम्पनीला 65 कोटी रुपयांची मदत अनुदानाच्या स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. या पैशांचा वापर बेंगळुरूमध्ये तयार करण्यात आलेल्या भारत बायोटेकच्या नव्या सेंटरमध्ये लशीच्या उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी करण्यात येईल.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी