कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. पण अजूनही लोक लस घ्यायला घाबरत आहेत. काही डॉक्टरांनी लसीचे दोन डोस घेतले असून त्यांच्यामते मोठ्या प्रमाणात एंटीबॉडीज लसीकरणानंतर तयार होतात. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लस परिणामकारक ठरत आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या डॉक्टरांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.लसीचा डोस घेतल्यानंतर अनेक डॉक्टरांमध्ये ४० टक्के आणि तर काहीजणांमध्ये ३५०० टक्के प्रोटीन्स एंटीबॉडी तयार झाल्या होत्या.
जितक्या जास्त एंटीबॉडीज तयार होतात. तितका जास्तवेळ कोरोनापासून सुरक्षित राहता येतं. दैनिक भास्करशी बोलताना डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरात ४०० एंटीबॉडीज तयार झाल्यानंतर जवळपास ६ ते ८ महिन्यांपर्यंत कोरोनापासून बचाव होऊ शकतो. या एंटीबॉडीचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स जाणवत नाहीत. हाय लेव्हल एंटीबॉडी तयार झालेल्या डॉक्टरानी माध्यमांशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.
लस घेतल्यानंतर कोरोनाचं संक्रमण झालं तरिही तीव्रता जाणवणार नाही.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लसीचे परिणाम ८० टक्के दिसून आले असले तरिही ज्या लोकांमध्ये लस घेतल्यानंतर एंटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यांना कोरोनाचं संक्रमण झालं तरिही माईल्ड असेल म्हणजेच रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच लस घेतल्यानंतर तुमचं जीवन सुरक्षित असेल. CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
दोन प्रकारच्या असतात एंटीबॉडीज
कोरोनातून बाहेर आल्यानंतर एक ते दोन महिन्यात एंटीबॉडी तयार होतात. या एंटीबॉडीज १ ते १५० टक्क्यांपर्यंत असू शकतात. लसीकरणानंतर जे एंटीजबॉडी प्रोटिन्स तयार होतात ते १५ ते ४००० टक्क्यांपर्यंत असू शकतात. डॉ. मधूकर परिख सांगतात की, ''जरी एंटीबॉडीज तयार झाल्या नाहीत तरी लसीकरणानंतर सेल मेमरीमध्ये प्रोटेक्शन मिळू शकते. यामुळे एंटीबॉडी कमी जास्त तयार झाल्या तरी फारसा फरक पडत नाही. '' ‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित
सप्टेंबरमध्ये आणखी एक कोरोना लस येणार
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना व्हायरसची लस, कोवॅक्सिनची वैद्यकिय चाचणी सुरू होणार आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत ही लस दाखल होऊ शकतो. ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकन लस कंपनी नोवावॅक्सनं सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियासह लायसेंस कराराची घोषणा केली होती.
नोवावॅक्सनं हा करार कोविड १९ लस ’ एनवीएक्स-सीओ2373 सह विकासासाठी केला होता. ही लस भारतासह मध्यम आणि कमी लोकसंख्येच्या देशात उपलब्ध करून दिली जाणार आहे. पूनावालांनी ने ट्वीट केलं आहे. त्यात नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार ''कोवोवॅक्सची वैदयकिय चाचणी भारतात सुरू होणार आहे. या लसीचा विकास नोवावॅक्स आणि सीरम इंस्टिट्यूटद्वारे केला जाणार आहे.