कोरोनाची लसीकरण मोहिम जानेवारीपासून सुरू झाली असून लोकांमध्ये लसीकरणाबाबत उत्साह आहे. पण दुसरीकडे कोरोनाची लस घेतल्यानंतरही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अनेकजण कोरोनाच्या लसीचा डोस घेतल्यानंतरही पुन्हा संक्रमित झाले आहेत. त्यामुळे लस घेतल्यानं कोरोनापासून बचाव होईल का? अशा प्रश्न लोकांना पडतोय. आज आम्ही तुम्हाला लसीकरणानंतर कोरोना पॉझिटिव्ह होण्याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे. याबाबत सांगणार आहोत.
कमी कालावधी
कोरोनाची लस साधारणपणे १० ते १२ महिन्यात तयार केली. कोणत्याही लस निर्मितीसाठी जवळपास चार ते पाच वर्ष लागतात. कोरोनाची लस तयार करण्यासाठी फारसा वेळ हातात नव्हता. कारण कोरोनाच्या उद्रेकानं सर्वत्र थैमान घातलं होतं. त्यामळेच या लसीची कार्यक्षमता १०० टक्के नसून कोविशिल्डची कार्यक्षमता फक्त ६२ टक्के आहे. कोवॅक्सिनच्या शेवटच्या टप्प्याताली चाचणीतील माहिती अजूनही समोर आलेली नाही. ही लस ८२ टक्के परिणामकारक ठरत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
व्हायरचा बदलता स्ट्रेन
कोरोनाची लस घेतल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह येण्याचं सगळ्यात मोठं कारण कोरोनाचा बदलता स्ट्रेन हे असू शकतं. दक्षिण आफ्रिका, युके, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनशी लढण्यासाठी भारतीय लस कितपत प्रभावी ठरू शकते याबाबत शंका आहे.
लसीच्या दोन डोसमधील फरक
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या दोन डोसमधील अंतर तीन महिने तसंच बारा आठवड्याचे असू शकते. आपल्याकडे दोन डोसमध्ये चार आठवड्याचे अंतर ठेवायला सांगितले जात आहे. यामुळे देखील चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. Healthy Breakfast Ideas : कमी कॅलरीजसह पौष्टीक नाष्ता करायचा असेल तर हे ५ पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन; फिट राहण्याचा सोपा फंडा
निष्काळजीपणा
लस घेतली म्हणजे आपण कोरोनापासून बचावलो आणि आता कोरोनाचा धोका नाही. असा गैरसमज अनेकांचा झाला आहे. त्यामुळे लोक मास्कच्या वापराबाबत जागरूक नाहीत. सोशल डिस्टेंसिंग पाळलं जात नाहिये, सॅनिटायझर वापरण्याचं प्रमाण कमी झालंय. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची लस घेऊनही चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. Headache warning sign : 'या' प्रकारच्या डोकेदुखीला सामान्य समजणं ठरतंय गंभीर आजाराचं कारण, जाणून घ्या ५ प्रकार