शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

CoronaVaccine : खूशखबर! झायडस कॅडिला लसीला लवकरच मंजुरी! 12 वर्षांवरील मुलांना दिली जाणार लस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 1:41 PM

झायडसच्या या लसीला मुंजुरी मिळाल्यास, 12 ते 18 वर्षांतील मुलांसाठी ही देशातील पहिलीच व्हॅक्सीन असेल. (CoronaVaccine Zydus cadila)

नवी दिल्ली - भारतातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला लवकरच मोठे यश मिळू शकते. झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) कोरोना लसीला लवकरच आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळू शकते. असे झाल्यास, भारतात वापरली जाणारी ही सहावी लस असेल. (CoronaVaccine Zydus cadila vaccine emergency use authorization for 12 years above)

विशेष म्हणजे झायडस कॅडिलाची लस 12 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांसाठी असू शकते. झायडसच्या या लसीला मुंजुरी मिळाल्यास, 12 ते 18 वर्षांतील मुलांसाठी ही देशातील पहिलीच व्हॅक्सीन असेल. अहमदाबाद येथील झायडस कॅडिला कंपनीने जगातील पहिली DNA बेस्ड कोविड लस बनवली आहे. चाचणीमध्ये त्याच्या यशाची टक्केवारी 77 टक्क्यांपर्यंत नोंदवली गेली आहे.

CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा!

आतापर्यंत पाच लसींना मंजुरी -आतापर्यंत भारतात एकूण 5 लसींना मंजुरी देण्यात आली आहे. यांपैकी Covishield, Covaccine आणि Sputnik-V या तीन लसी देशभरात वापरल्या जात आहेत. याशिवाय, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन (सिंगल डोस) लसींना मंजुरी मिळाली आहे. तर आता झायडस कॅडिलाला मंजुरी मिळाल्यास ती देशातील सहावी लस असेल. भारतात आतापर्यंत 50 कोटीहून  अधिक डोस देण्यात आले आहेत.

CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

डिसेंबर 2021 पर्यंत सर्व प्रौढांना लसीचा किमान एक डोस देण्याचे भारत सरकारचे लक्ष्य आहे. तसेच, सप्टेंबरपर्यंत देशात रोज एक कोटी लसी दिल्या जाऊ शकतील, अशी अपेक्षित आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतGujaratगुजरात