सोमवारी संध्याकाळी कोरोनाची लस तयार होण्याच्या बातमीने संपूर्ण जगभरातील लोकांना आशेचा किरण दाखवला आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करता येऊ शकतो. असे सगळ्यांनाच वाटत आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात असून या तीन्ही लसी अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी जगभरातील कोणत्या लसी अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
सिनावॅक
चीनी वैज्ञानिक कोरोना व्हायरसची लस तयार करण्याच्या शर्यतीत सगळ्यात पुढे आहेत.ज्या देशातून ही माहामारी पसरली त्या देशात कोरोना व्हायरसच्या लसीचे नमुने तयार करण्यात आले आहेत. चीनी कंपनी सिनोवॅक बायोटेक ने दावा केला आहे की जगभरातील अनेक देशांमध्ये या लसीची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. चीनी कंपनी कोरोनाची लस तयार करण्याच्या जवळपास पोहोचली असून आता ब्राझिल आणि बांग्लादेशमध्ये या लसीचे परिक्षण सुरू करण्यात आले आहे.
एक्स्ट्राजेनेका (AstraZeneca / Oxord University)
या लसीबाबत काल अनेक सकारात्मक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील एक्स्ट्राजेनका या लसीचे मानवी परिक्षण यशस्वी झाले आहे. म्हणजेच आता शेवटच्या टप्प्यातील लसीचे परिक्षण पूर्ण होण्यसाठी जास्त कालावधी लागणार नाही. ब्रिटीश तज्ज्ञांनी या लसीच्या शेवटच्या टप्प्यातील परिक्षण साऊथ आफ्रिका आणि ब्राझिलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
युनिवर्सिटी ऑफ मेलबर्न (Univerisy of Melborn)
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नची लस शर्यतीत पुढे आहे. या तज्ज्ञांनी १०० वर्ष जुन्या टीबीच्या (TB Vaccine) औषधापासून कोरोना व्हायरसची लस तयार केली आहे. व्हायरशी लढण्यासाठी ही लस फारशी कार्यक्षम नसून व्हायरसशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही लस यशस्वी ठरली आहे. या लसीच्या परिक्षणाचे २ टप्पे पूर्ण झाले असून आता अंतीम टप्प्यातील संशोधनास सुरूवात होणार आहे.
लस तयार होण्यासाठी किती वेळ लागू शकतो.
दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सफल झाले म्हणजे लस पूर्णपणे तयार झालेली असते. पण कोरोना व्हायरस हा माहामारीच्या स्वरुपात पसरला आहे. संपूर्ण जगभरातील लोकांना कोरोना व्हायरसने प्रभावित केलं आहे. शेवटच्या टप्प्यातील चाचणी झाल्यानंतर क्लिनिकल ट्रायलसाठी १ ते ४ वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो. तरिही संशोधक सगळी परिक्षणं वेगाने करत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लस सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते. अशी आशा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी