कोरोनाच्या माहामारीचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं होतं. पण सध्या लॉकडाऊचे नियम भारतात शिथिल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी लॉकडाऊन उठवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत आपली काम ठप्प पडू नयेत यासाठी कोरोनासोबत जगण्याची तयारी सगळ्यांचीच असावी.
त्यासाठी आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. सोशल डिस्टेसिंग, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यासोबतच आपलं आरोग्य आतून चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला सोपे व्यायामप्रकार सांगणार आहोत. या उपायांनी तुम्ही आपली फुफ्फुसं चांगली ठेवू शकता.
ब्रिदिंग
या व्यायाम प्रकारात तुम्हाला श्वसन यंत्रणेवर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये रक्त पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल. सगळ्यात आधी ४ सेकंदापर्यंत श्वास रोखून धरा. जेणेकरून फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचेल. मग ४ सेकंदांनी श्वास सोडून द्या. त्यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो.
कार्डीओ
हा व्यायाम केल्याने शरीरातीतून घाम बाहेर पडतो शिवाय हृदयाचे ठोके नियमित होण्यास मदत होते. कार्डियो एक्सरसाईज फुफ्फुसांसाठी देखील फायदेशीर असतं. यात साधेसोपे व्यामाम प्रकार असतात. चालणे, एकाच जागी उभं राहून उड्या मारणे, जंपिंग जॅक, चालणे, सायकलिंगचा यात समावेश असतो. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते
याशिवाय आहारही चांगला घ्यायला हवा जेणेकरून फुफ्फुसांना पोषण मिळेल, मादक पदार्थाचं सेवन करू नका. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला आजाराचं शिकार व्हायला लागू शकतं. त्यामुळे संतुलित आहार घ्या. व्हिटामीन सी असलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करा.
CoronaVirus : ... म्हणून कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या कमी; CDC चा दावा
आशेचा किरण! आता 'या' सेल्सची संख्या वाढवून कोरोनावर करता येणार मात, तज्ज्ञांचा दावा