भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे (Coronavirus new variant) एकूण 795 संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा समावेश आहे. दरम्यान यूकेतील नवा कोरोना (UK corona variant) हा तरुणांना जास्त संक्रमित करत असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.
पंजाब राज्यातील 401 नमुन्यांपैकी 81% नमुने युकेच्या स्ट्रेननं संक्रमित असल्याचे दिसून आले आहेत. हा नवा स्ट्रेन तरुणांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून आला आहे, असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं. त्यामुळे तरुणांचंही लसीकरण करावं, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. यूकेच्या B.1.1.7 या कोरोना स्ट्रेनवर कोविशिल्ड कोरोना लस प्रभावी असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. यासह कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे.
दरम्यान आज कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयानुसार येत्या १ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशातील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोनावरील लस दिली जाईल. या लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांनी आपल्या नावांची नोंदणी करावी, असे आवाहन जावडेकर यांनी यावेळी केले. तसेच भारताकडे कोरोनावरील लसीचे पुरेसे डोस आहेत. तसेच भारतात अनेक लसी चाचणीच्या टप्प्यात आहेत, असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारने १ मार्चपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण सुरू केले होते. १ मार्चपासून देशातील ६० वर्षांवरील नागरिकांना आणि गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि दिल्ली यांसारख्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात तर एका दिवसांत ३० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे शासन आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा