कोरोनाच्या माहामारीचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेतील संक्रामक रोग तज्ज्ञ आणि कोरोना नियंत्रण कमिटीचे सभासद डॉ. एंथनी फाउची यांनी दिलेल्या माहितीनुसार लस तयार झाल्यानंतरही कोरोनाचा प्रसार अमेरिकेत थांबणार की नाही. याबाबत शंका आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार फाऊची यांनी सांगितले की, अमेरिकेतील अनेक लोक लसीला प्राधान्य देतील की नाही याबाबत तज्ज्ञ साशंक आहेत. त्यामुळे लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होणार की नाही. याबाबत माहिती नाही.
एंथनी फाउची यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लस ट्रायल दरम्यान ७० ते ७५ टक्के परिणामकारक ठरू शकते. प्रभावी लस दिल्यानंतर ६० टक्के लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते. त्यामुळे व्हायरसची चेन तुटून संक्रमणाचा धोका कमी होण्यास मदत मिळेल.
मागील महिन्यात सीएनएनने एका सर्वेमध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील तीन तृतीयांश लोक हे, लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असेल आणि स्वस्त असेल तरीही घेणार नाहीत. ७० ते ७५ टक्के लोकांना लस दिल्यास पूर्णपणे हर्ड इम्यूनिटी विकसीत होईल. याची शक्यता कमी आहे.
अमेरिकेतील काही लोकांमध्ये एंटी सायंस, एंटी ऑथोरिटी, एंटी वॅक्सीन अशा प्रकारचे विरोधी वातावरण तयार झालं आहे. अशी स्थिती पाहता लोकांमध्ये लसीबाबत जागरुकता निर्माण करणं गरजेचं आहे. परंतु ही बाब इतकी सोपी नाही. रुबोला व्हायरस या आजारात ९७ ते ९८ टक्के प्रभावी ठरणारी लस उपलब्ध झाली होती. तर कोरोना व्हायरसची लस ७० ते ७५ टक्के परिणामकारक ठरत असल्यास वापर करण्यास हरकत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
लॅबमध्ये तयार केलेल्या एँटीबॉडीने कोरोनाचा खात्मा होणार; 'या' महिन्यात पूर्ण होणार मानवी चाचणी
Coronavirus : डॉक्टरांनी दिला इशारा; कोरोनामुक्त झाल्यावर रूग्णांना PTSD चा धोका, वाचा काय आहे PTSD?