(Image Credit ; esquiremag.ph)
कोरोना व्हायरसची लागण ही जगभरात महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अधिक बघायला मिळत असल्याचा दावा केला जात आहे. ग्लोबल हेल्थ 50/50 ने कोविड-19 चे शिकार होऊन आपल्या जीव गमावणाऱ्यांचं विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. कोविड-19 चं केंद्र बनलेल्या इटलीमध्ये एकूण टेस्ट पॉजिटिव्ह आलेल्या पुरूषांचं प्रमाण हे 60 टक्के आहे तर या महामारी मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 70 टक्के आहे. ही आकडेवारी इटलीच्या नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटने जारी केला आहे. तेच चीन आणि दक्षिण कोरियातही हाच ट्रेन्ड समोर आला. अमेरिकेतून अजून लैंगिक आधारावरील आकडेवारी जारी केलेली नाही.
पुरूषांना जास्त धोका
असा स्पष्ट दावा केला जात आहे की, कोरोनाचा धोका पुरूषांना जास्त आहे. पण याचं कोणतंही वैज्ञानिक कारण समोर आलेलं नाही. असा अंदाज लावला जात आहे की, पुरूष धुम्रपान जास्त करतात, त्यामुळे त्यांचे महत्वपूर्ण शारीरिक अंग आधीच डॅमेज असतात. त्यामुळे कोरोना व्हायरस अशांवर वेगाने प्रभाव करतो. तसेच जे आधीच आजारी आहेत त्यांची इम्यूनिटी कमजोर असते, त्यामुळे पुरूष याचे जास्त शिकार होत आहेत.
आणखी काय कारणे असू शकतात?
edition.cnn.com ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, चीनचं उदाहरण द्यायचं तर इथे धुम्रपान करणाऱ्यांची संख्या जगात सर्वात जास्त आहे. अर्ध्यापेक्षा जास्त चीनचे लोक धुम्रपान करतात तर 3 टक्के चीनी महिलांना धुम्रपानाची सवय आहे. त्याचप्रमाणे इटलीमध्ये 70 लाख पुरूष आणि 45 लाख महिला धुम्रपान करतात.
इटलीमध्ये कोविड-19 ने मरणाऱ्या 99 टक्के लोकांना आधीच काहीना काही आजार होता. यातील 75 टक्के लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या होती. हाय ब्लड प्रेशरची समस्या ही पुरूषांमध्ये अधिक आढळून येते. तसेच महिलांच्या तुलनेत पुरूष जास्त प्रवास करतात. दुसरा असाही मुद्दा आहे की, महिलांच्या तुलनेत पुरूषांची तपासणी जास्त होत आहे.
पुरूषांना किती धोका?
ग्लोबल हेल्थ 50/50 चं विश्लेषण जास्त व्यापक नाही. कारण यात जगातल्या केवळ एक चतुर्थांश लोकसंख्येचंच परीक्षण केलं आहे. या विश्लेषणानुसार, 'प्रत्येक देशातून लिंगानुसार वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे. ज्यानुसार महिलांच्या तुलनेत पुरूषांना कोविड-19 चा होण्याचा धोका 10 ते 90 टक्के जास्त आहे'. भारतातही कोविड-19 ने मरणाऱ्या 10 लोकांमध्ये केवळ 1 महिला आहे.
याआधीही हाच ट्रेन्ड
कोरोना व्हायरसआधी SARS आणि MERS दरम्यानही हाच ट्रेन्ड बघण्यात आला होता. सौदी अरबमधून पसरलेल्या MERS-Cov वर करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं होतं की, या आजाराने पुरूषांचा जीव जास्त जातोय याचं कारण हे असू शकतं की, महिला साफ-सफाई आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी खास काळजी घेतात. असंच H1N1 च्या महामारीवेळीही बघण्यात आलं होतं. रिसर्चमधून समोर आलं होतं की, महिलांचा मृत्यू दर कमी असण्याचं कारण हे असू शकतं की, सौदी अरबमध्ये जास्तीत जास्त महिला बुरका घालतात.