नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने नवी आणि महत्वाची गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईनमध्ये लोकांना, कोरोनापासून कशा प्रकारे बचाव करावा आणि त्यावर कसे उपचार करावेत, यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे आयुष मंत्रालयाची नवी गाईडलाईन...
कोरोना होण्यापूर्वी बचावासाठी आयुरक्षा किट- - 6 ग्रॅम चवनप्राश रोज - आयुष क्वाथ (काढा) - संशमनी वटी - अणू तेल
कोरोना होण्यापूर्वी या 2 औषधांचा करू शकता वापर -- गुडुची घनवटी 500 mg दिवसातून दोन वेळा- अश्वगंधा 500 mg दिवसातून दोन वेळा
कोरोना झाल्यानंतर असा करावा बचाव -- आयुष 64 - हे औषध देखील लक्षण नसणाऱ्या आणि हलक्या स्वरुपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना फायदेशीर आहे.- काबासूर कुडीनीर औषध - पाण्यात उकळून घेऊ शकता, 5 ग्रॅम दिवसातून 2 वेळा.
होमिओपॅथीद्वारे बचावासाठी -होमिओपॅथीद्वारे (Homeopathy) बचावासाठी आर्सेनिक एल्बुमिन (Arsenicum Album) घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे 139 स्टडीजच्या आधारे आयुष मंत्रालयाने कोरोनावरील उपचाराची ही नवी अॅडव्हायजरी जारी केली आहे. इम्युनिटी चांगली असल्यास कोरोनाविरोधातील लढाई आणखी सोपी होईल, असे आयुष मंत्रालयाचे मत आहे.
कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करा -आयुष मंत्रालयाने मास्कचा वापर करणे, हात योग्य पद्धतीने स्वच्छ करणे, शारीरिक आणि सामाजिक अंतर पाळणे, कोरोना लसीकरण, सकस आहार, उत्तम प्रतिकारशक्ती आणि इतर आरोग्य सेवांशी संबंधित नियमांचे पालन करण्यासही सांगितले आहे.