(image credit- Pixabuy)
जगभरातील सर्व देश हे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून मृतांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीदेखील सातत्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. जगभरात तब्बल एक कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत सहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोना विषाणूंचे संक्रमण जसजसं वाढत आहे. तसतसं कोरोनाच्या प्रसाराबाबात नवनवीन माहिती लोकांसमोर येत आहे. सुरूवातीला तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मास्कचा वापर कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठरू शकतो. आतापर्यंत एन ९५ मास्क हा सगळ्यात सुरक्षित मानला जात होता. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने याबाबत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यामुळे एन ९५ मास्क कोरोनाशी लढण्याासाठी सुरक्षित ठरू शकत नाही असा दावा करण्यात आला आहे. मास्कच्या वापराबाबत निष्काळजीपणा केल्यास कोरोनाचं संक्रमण वाढण्याची शक्यता असते.
मास्क लावल्यानंतर कोरोनाचं संक्रमण होणार नाही असं म्हणता येणार नाही पण मास्कच्या वापराने कोरोना प्रसाराचा धोका कमी होतो. जगभरातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अशा स्थितीत घरातून बाहेर निघणं टाळायला हवं. महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागत असेल तर मास्कचा वापर करायला हवा. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारातून मास्क विकत घेण्याापेक्षा घरी तयार केलेल्या मास्कला प्राधान्य द्यायला हवे. अपोलो रुग्णालायतील डॉ. यश यांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमणपासून बचाव करण्यासाठी घरी तयार केलेला मास्क जास्त प्रभावी ठरतो. मास्क तयार करण्यासाठी सुती कापडाचा वापर करणं गरजेचं आहे.
अनेकांना रस्त्यावर थुंकण्याची सवय असते. सार्वजनिक स्थळांवर थुंकल्यामुळे कोरोनाच इतर गंभीर आजार पसरण्याचा धोका असतो. जर संक्रमित व्यक्तीने रस्त्यावर थुंकले तर इतरांच्या चपलांमुळे संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे हेरेटायटीस, टीबी यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. रस्त्यावर थुंकण्याची सवय सोडायला हवी. तसंच ही माहामारी नियंत्रणात येऊ शकते.
काळजी वाढली! कोरोनातून बरं झाल्यानंतर वर्षभरातच रुग्णांना उद्भवू शकते 'ही' समस्या
कोरोनाच्या लढाईत निष्काळजीपणा! नदी किनारी फेकला जातोय पीपीई किट्स, शवपेटीचा कचरा