जगभरात जसजसं कोरोनाचं थैमान वाढत आहेत, तसतशी मास्कची मागणी वाढत आहे. पण दाढी किंवा लांब ठेवणारे लोक केवळ मास्क लावून निश्चिंत राहू शकत नाहीत. दाढी असल्यावर कितीही चांगला मास्क वापरला तरी सुद्धा तुम्ही पूर्णपणे चेहरा झाकू शकत नाहीत. 2017 मध्ये यावर Centers for Disease Control and Prevention (CDC) ने रिसर्च केला. यातून समोर आले होते की, चेहऱ्यावर केस असतील तर मास्क त्याचं काम योग्यप्रकारे करू शकत नाही.
कसं काम करतो मास्क?
व्हायरस नाकावाटे श्वसननलिकेद्वारे शरीरात शिरतात आणि फुप्फुसातून आपल्या शरीरात सगळीकडे पसरतात. तेच मास्क लावला तर मास्क हवेसाठी चाळणीसारखं काम करतं आणि हवा फिल्टर होऊन नाकात शिरते. ही हवा बरीच स्वच्छ असते. एन95 मास्कची खासियत ही असते की, यात काहीच लिकेज नससतं. म्हणजे श्वास घेताना मास्कच्या कोपऱ्यांमधून हवा आत शिरत नाही. याने 95 टक्के कणांपासून आपला बचाव होतो.
अडचण कशी होते?
अनेकदा दाढी असलेल्या लोकांचा असा गैरसमज असतो की, त्याच्या चेहऱ्यावरील केसांमुळेही हवा फिल्टर होते. CDC याला चुकीचं मानते. केस कधीही मास्कचं काम करू शकत नाहीत. उलट मास्क लावल्यावर केसांमुळे मास्क योग्य काम करू शकत नाही. त्यामुळे लिकेजची भीती 20 ते 100 पटीने वाढते. अशात आजारी व्यक्ती तुमच्या संपर्कात आली तर तुम्हाला संक्रमण होऊ शकतं.
काय सांगतात एक्सपर्ट?
CDC चं असं मत आहे की, चेहऱ्यावर जेवढे कमी केस असतील मास्क तेवढा चांगला फिट बसेल. खासकरून N-25 रेस्पिरेटरच्या बाबतीत याची गरज अधिक वाढते. कारण जास्तीत जास्त लोकांना हा मास्क लावण्याची पद्धत माहीत नसते. Agency for Toxic Substances and Disease Registry चे माजी मुख्य मेडिकल ऑफिसर Dr. Robert Amler यांच्यानुसार, जास्तीत जास्त लोकांना मास्क लावणं माहीत नसतं आणि जर दाढी व मिशा असताना मास्क लावला तर रेस्पिरेटर सीलमधून लिकेजचा धोका अधिक वाढतो.
कस्टम मेड मास्क
इस्त्राइलने कस्टम मेड मास्क तयार करण्याचा प्रयत्न केला. ज्याचा वापर लांब दाढी असलेले लोक करू शकतील. इस्त्राइलमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 9 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. येथील लोकांना दाढी कापावी लागू नये, त्यानुसार मास्क तयार केले जात आहेत.
नर्सनी केलं टक्कल
तेच या घटनेच्या उलट चीनमधील हॉस्पिटल्सनी वेगवेगळी पावले उचलली होती. वुहान सेंट्रल हॉस्पिटलमधील रूग्णांची काळजी घेणाऱ्या अनेक नर्सेसनी टक्कल केलं होतं. जेणेकरून कोणत्याही प्रकारे पॅथोजन पसरू नये. असं वृत्त People's Daily China मध्ये प्रकाशित झालं होतं.