Coronavirus COVID-19 मुळे आज स्वच्छता ठेवणं फारच गरजेचं झालं आहे. स्वच्छतेसाठी उचलेलं प्रत्येक पाउल आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. सध्या संक्रमण किंवा व्हायरसची लागण होण्याच्या भीतीने आपला तणावा सतत वाढत आहे. अशात ही तणावाची समस्या त्या लोकांमध्ये अधिक वाढत आहे जे लोक स्वच्छतेबाबत नेहमीच चिंतेत असतात. असे लोक ऑब्सेसिव कम्प्लसिव्ह डिसॉर्डर (obsessive compulsive disorder) किंवा ओसीडीने पीडित असतात. आता कोरोनामुळे हे लोक स्वच्छतेबाबत अधिक ऑब्सेसिव होत आहेत. तसेच ज्यांना ओसीडीची समस्या नाही त्यांना आता ही समस्या होऊ शकते. कारण बरेच लोक केवळ भीतीमुळे सतत स्वच्छता करत आहेत.
ओसीडी असलेल्या लोकांना नियंत्रणात राहण्यासाठी स्वच्छता करत राहण्याची एक गरज सतत जाणवत असते. सध्या स्वच्छतेबाबत काही सूचना करण्यात आल्या आहेत. जसे की, 20 सेकंदांपर्यत हात धुवावे. आता ओसीडी असलेल्या लोकांसाठी ही बाब संभ्रमात टाकणारी असू शकते. कारण ते आधीच स्वच्छतेसाठी चिंतेत राहत होते आणि आता तर त्यांना कारणच मिळालं. आता ओसीडी असलेले लोक 20 सेकंदांनंतरही हात धुणं सुरू ठेवतात. त्यामुळे अशावेळी स्वच्छता कुठे ठेवायची आहे जे ध्यानात घ्या....
- बाहेरून आल्यावर 20 सेकंद चांगले होत धुवावे.
- वॉशरूम आणि जेवणाआधी हात धुवावे.
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा बाहेरील वस्तूला हात लावल्यावर.
स्वच्छतेची सवय नियंत्रणात ठेवण्यासाठी काही टिप्स
केवळ 20 सेकंद हात धुवा आणि जास्त विचार करू नका
तुम्ही बाहेरून घरात आले असाल किंवा तुम्ही कशाला स्पर्श केला असेल किंवा वॉशरूममधून आले असाल तर हात केवळ 20 सेकंदांपर्यंतच धुवावे. नंतर तुम्ही सॅनिटायजरचा वापर करा आणि याबाबत विचार करणं बंद करा. तसेच सतत कोरोना आणि स्वच्छता याबाबत विचार करू नका. दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त रहा.
तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न
पुन्हा-पुन्हा स्वच्छता करणाऱ्या लोकांना अस्वच्छतेची भीती वाटत असते. त्यांना सामान्यपणे स्वच्छता आणि पुन्हा-पुन्हा हात धुण्याची सवय असते. याने तुमचा तणाव वाढत राहतो. त्यामुळे तणाव कमी करण्याचा मार्ग शोधा. कठिण परिस्थितीचा सामना करण्यासाठी भावनात्मक लवचिकता विकसित करा आणि स्वत:ला अधिक स्वच्छता करण्यापासून रोखा.
स्वत:ची समजूत काढा
कोणतीही सवय मोडायची असेल तर स्वत:चे काही नियम तयार करावे आणि ते स्वत: लक्षात ठेवावे. असं लक्षात ठेवा की, जेव्हा गरज असेल तेव्हाच तुम्ही हात धुवाल किंवा स्वच्छता कराल. जर अस्वस्थता वाढत असेल मोठा श्वास घ्या आणि शांत रहा. श्वास आत-बाहेर घ्या.
फोन दूर ठेवा
आराम करण्याची एक चांगली पद्धत म्हणजे उपकरणे दूर ठेवा. तुम्ही तुमच्या फोनचा कमीत कमी वापर करा. फोन बघण्यापेक्षा पुस्तक वाचा किंवा दुसरं एखादं काम करा. तुमच्या आवडी पूर्ण करा. याने तुम्हाला डोक्याला शांतता मिळेल.