कोरोना व्हायरसचं संक्रमण अनेकांच्या जीवावर बेतलं आहे. संपूर्ण जगभरातील कोरोना रुग्णांवर याचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे श्वसनाचे आजार उद्भवत असून हृदयावरही परिणाम होत आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे हृदयाशी निगडीत गंभीर आजार उद्भवण्याचा धोका वाढू शकतो.
शिकागो युनिव्हर्सिटीतील डॉक्टर सीन पिन्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयासंबंधी आजारांनी पिडित असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. त्यामुळे हृदयाला नुकसान पोहोचू शकतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरसच्या संक्रमणामुळे रक्तवाहिन्यांवर नकारात्मक परिणाम होऊन सूज येण्याची स्थिती उद्भवते. अनेकदा रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे हृदयात ऑक्सिजनची कमतरता उद्भवते.
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीच्या जर्नलमध्ये नमुद करण्यात आलेल्या एका शोधानुसार रुग्णालयात भर्ती असलेल्या कमीत कमी २५ टक्के कोरोना रुग्णांमध्ये हृदयासंबंधी समस्या दिसून आल्या होत्या. इतर रुग्णालयांमध्ये ही संख्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक होती. लहान पातळीवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात निमोनियाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरात व्हायरसचे काही नमुने आढळून आले होते.
एका रुग्णालयातील चार रुग्णाच्या मासपेशींमध्ये सुज येण्याची समस्या उद्भवली होती. जे कोरोनाच्या हलक्या लक्षणांतूनवर आले होते. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी बोर्डाचे सदस्य डॉ. टॉम मॅडॉक्स यांनी सांगितले की, व्हायरस असामान्य हृदय रोगाचे कारण ठरू शकतो. यावर अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाच्या संक्रमणानंतर उद्भवते लॉन्ग कोविडची समस्या
कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांना संक्रमण 'लॉन्ग कोविड' च्या समस्येचा सामना करावा लागत आहे, म्हणजेच कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांमध्ये काही आठवढ्यांनी किंवा महिन्यांनी लक्षणं दिसून येत आहेत. कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका गंभीर आजार असलेले लोक, वयस्कर लोक, अस्थमा, लठ्ठपणा यांसारख्या समस्या असलेल्या लोकांना जास्त असतो. याव्यतिरिक्त ज्या लोकांमध्ये कोरोना व्हायरसची पाचपेक्षा अधिक लक्षणं दिसून येतात त्यांना लॉन्ग कोविडचा धोका जास्त असतो. किंग्स कॉलेज लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनातून संशोधकांनी हा दावा केला होता. दिलासादायक! कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतेय 'ही' नवी थेरेपी, असा होणार बचाव
किंग्स कॉलेज लंडनच्या एका रिसर्चनुसार २० पैकी एक व्यक्ती आठ आढवड्यापेक्षा जास्तकाळ आजारी होता. या अभ्यासात नमुद करण्यात आले होते की, लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये संक्रमणानंतर लक्षणं दिसून आली असून ही लक्षणं अनेक महिन्यांपर्यंत दिसत होती. या समस्येला लॉन्ग कोविड असं म्हणतात. किंग्स कॉलेज लंडनमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनातून दिसून आलं की, कोरोना संक्रमणाच्या आधीच्या आठवड्यात पाचपेक्षा अधिक लक्षणं होती. त्यामुळे लॉन्ग कोविडचा धोका जास्त उद्भवला होता. भय इथले संपत नाही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; 'या' देशात पुन्हा महिनाभराचा लॉकडाऊन घोषित