शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Coronavirus : CDC चा सल्ला, महामारी दरम्यान घराबाहेर पडताना 'या' 3 वस्तू न विसरता ठेवा सोबत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:13 AM

अनेक रिसर्चमधून आणि तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे की, आता पुढील काही वर्ष या व्हायरससोबत आपल्याला जगावं लागेल. अशात यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय सर्वांनाच माहीत असले पाहिजेत.

जगभरातील लोकांना अजूनही कोरोना व्हायरस महामारीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत जगातले 93 लाख याने संक्रमित झाले आहेत आणि काही दिवसातच या व्हायरसने संक्रमित होणाऱ्यांची संख्या 1 कोटीपर्यंत पोहोचेल. भारतात तर रूग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, आर्थिक मंदी येऊ नये म्हणून लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. अनेक रिसर्चमधून आणि तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे की, आता पुढील काही वर्ष या व्हायरससोबत आपल्याला जगावं लागेल. अशात यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय सर्वांनाच माहीत असले पाहिजेत.

अमेरिकेतील सेंटर ऑर डिजीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रिव्हेंशन (CDC) ने कोरोना व्हायरसपासून बचावासाठी काही सूचना केल्या आहेत. CDC ने सांगितले की, या महामारी दरम्यान जे कुणी छोट्या-मोठ्या कामासाठी बाहेर पडत आहेत, मग ते दिवसभरासाठी असो वा 2 तासांसाठी त्यांनी सोबत 3 गोष्टी नक्की ठेवाव्या. या तीन वस्तू कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता फार कमी करतात. याने तुम्ही बाहेर जाऊनही सुरक्षित राहू शकता.

टिशू पेपर्स

(Image Credit : flo.health)

कोरोना व्हायरस महामारी दरम्यान टिशू पेपर तुम्हाला अनेक प्रकारच्या संक्रमणापासून वाचवू शकतं. त्यामुळे हे एक महत्वपूर्ण हत्यार आहे. जे तुम्ही कोरोनासोबत लढताना वापरू शकता. टिशू पेपरच्या मदतीने जर्म्स पसरण्यापासून रोखता येतात. आधी असे सांगितले जात होते की, शिंकताना किंवा खोकतांना हाताने तोंड झाका, पण असं करणं जास्त सुरक्षित नाही.

- शिंकताना तुम्ही टिशू पेपरचा वापर करू शकता. पब्लिक प्लेसमध्ये शिंकताना टिशू पेपरच्या दोन लेअर करून वापरू शकता. हे टिशू एका पिशवीत ठेवा. नंतर हा सॅनिटायजरने स्वच्छ करा.

- त्यासोबतच बाहेर गेल्यावर तुम्हाला अशाही काही वस्तूंना स्पर्श करावा लागतो ज्याला दिवसभर वेगवेगळे लोक हात लावत असतात. जसे की, बसमध्ये हॅंडल, मेट्रोमधील हॅंडल, पायऱ्यांवरील हॅंडरेल, लिफ्टचं बटन, ऑटोचं हॅंडल, पब्लिक वॉशरूमचं हॅन्डल इत्यादी. या वस्तूंना स्पर्श करण्याऐवजी टिशू पेपरचा वापर करा. याने तुम्ही बरेच सुरक्षित राहू शकता.

- गरज पडली तर तुम्ही टिशू पेपरचा वापर थोड्या वेळासाठी मास्क म्हणूनही करू शकता. याने व्हायरसच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी राहते.

कापडाचा फेस मास्क

कोरोना व्हायरसचे असे अनेक रूग्ण आहेत ज्यांच्यात याची लक्षणे अजिबात दिसत नाही. अशा लोकांसोबत केवळ बोलल्यानेही तुम्ही कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकू शकता. त्यामुळे तोंडावर नेहमी कापडाचा मास्क असेल याची काळजी घ्या. कापडाचा मास्क यासाठी कारण गरमीत तुम्हाला जास्त वेळ मास्क लावून ठेवावा लागू शकतो. त्यामुळे घाम खूप येतो. अशात दुसरे मास्क खराब होऊ शकता आणि तुम्हाला श्वास घेण्यासही समस्या होऊ शकते. म्हणून कापडाचा मास्क वापरा. पण केवळ मास्क लावणे हा एक उपाय नाहीये. हेही लक्षात ठेवलं पाहिजे की, कुणाशी बोलताना तुमच्यात त्या व्यक्तीमध्ये 1 ते 2 मीटरचं अंतर असावं. असं केल्याने तुम्ही व्हायरसच्या एक्सपोजरपासून वाचू शकाल.

हॅंड सॅनिटायजर

घरातून बाहेर निघताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वॉशरूमची व्यवस्था मिळणार नाही. अशात सतत हात धुवायला मिळणं शक्य नाही. खासकरून पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास करताना, बाजारातून सामान घेताना किंवा कामाबाबत मिटिंग करताना. ही कामे करताना शक्यता जास्त असते की, व्हायरस हातांद्वारे तुमच्या शरीरात पोहोचेल.

याच कारणाने घराबाहेर पडताना कमीत कमी 70 टक्के अल्कोहोल बेस्ड हॅंड सॅनिटायजर सोबत ठेवा. जेव्हा तुम्ही कामासाठी किंवा चुकून एखाद्या सार्वजनिक वस्तूचा वापर केला तर हात हॅंड सॅनिटायजरने चांगले स्वच्छ करा. जर तुम्हाला चेहऱ्यावर कुठेही किंवा नाका, केसांना, डोळ्यांना वा कानाला हात लावण्याची गरज भासत असेल तर आधी सॅनिटायजरने हात स्वच्छ करा. त्यानंतरच या अवयवांना हात लावा.

Coronavirus : कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांसाठी चिंतेची बाब, आयुष्यभरासाठी होऊ शकते 'ही' समस्या!

Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा!

Coronavirus : इम्यूनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा घेताना घ्या काळजी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य