कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरूवातीपासूनच डायबिटीस, उच्च रक्तदाब, दमा आणि श्वसनासंबंधी आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका जास्त असतो तसंच मृत्यूचाही सामना करावा लागू शकतो असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत एक सकारात्मक बाब समोर आली आहे. ज्या लोकांना आधी एका सामान्य सर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोनाव्हायरसची लागण झाली असेल, त्यांना कोरोना होतो मात्र तो गंभीर रूप घेत नाही. म्हणजेच रुग्ण गंभीर स्थितीत जात नाहीत. असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून दिसून आलं आहे.
जर्नल ऑफ क्लिनिकल इनव्हेस्टीगेशनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोरोना हा नवीन व्हायरस असून असे अनेक व्हायरस आहेत. कॉमन कोल्ड आणि न्यूमोनिया त्यापैकीच एक आहेत. कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरस Covid-19 साठी कारणीभूत ठरणाऱ्या SARS-CoV-2 ची तीव्रता कमी करण्यासाठी परिणामकारक ठरत असल्याचे एका संशोधनात दिसून आलं आहे. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले असून यात भारतीय शास्त्रज्ञांचाही सहभाग होता. ज्या रुग्णांना कॉमन कोल्ड झाला होता अशा रुग्णांना कोरोना झाल्यानंतर ICU, व्हेंटीलेटरची गरज पडली नाही. तसंच अशा रुग्णांमध्ये मृत्यूदरात प्रमाणही कमी आहे, असं संशोधकांना दिसून आलं.
अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातील तज्ज्ञ मनीष सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांना कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरसचं इन्फेक्शन झालं होतं, त्या लोकांमध्ये कोविड-19 ची गंभीर लक्षणं कमी प्रमाणात दिसून आली होती. कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरस SARS-CoV-2 सह काही जेनेटिक सिक्वेन्स तयार करते. परिणामी या तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनाशी लढण्यासाठी परिमाकारक ठरू शकते असं तज्ञांचे मत आहे. ज्यांना आधी non-SARS-CoV-2 कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल त्यांना आता कोरोनापासून बचाव करणं सोपं होऊ शकतं. कोरोनाची लस तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी हे संशोधन महत्वपूर्ण ठरेल असा दावा संशोधकांनी केला आहे.
कोरोना संक्रमणानंतर उद्भवू शकते 'लॉन्ग कोविड' ची समस्या
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनानंतर लॉन्ग कोविड समस्या ('Long Covid') निर्माण होऊ शकते. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा त्या स्थितीला लॉन्ग कोविड म्हणतात. कोरोना संक्रमण पूर्णपणे कमी झाल्यानंतर या समस्या दीर्घकाळ शरीराला उद्भवू शकतात. कारण कोरोनातून जीव वाचलेल्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे आजारपणही मोठ्या प्रमाणावर लोकांना उद्भवते. त्यामुळे अनेक लोकांना रोजची कामं करण्यासाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी
ब्रिटनच्या प्रसिद्ध तज्ज्ञांचा गट स्पेक्टर यांनी सांगितले होते की, कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम झाला आहे. श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा येणं तसंच शरीरातील इतर भागांवरही परिणाम होत आहे. अनेक महिन्यांपर्यंत असंच सुरू राहण्याची शक्यता आहे. किंग्स कॉलेज लंडनच्या तज्ज्ञांनी सांगितले होते की, कोरोना संक्रमित असलेल्या १० पैकी एका व्यक्तीला लॉन्ग कोविडची समस्या उद्भवू शकते. तज्ज्ञांनी जवळपास ४० लाख लोकांच्या माहितीचे विश्लेषण यासाठी केले होते. दर ५० पैकी एका व्यक्तीला ३ महिन्यानंतरसुद्धा 'Long Covid' चा सामना करावा लागत होता. दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....