नवी दिल्ली - मार्च महिन्यापासून देशात धुमाकूळ घालत असलेल्या आणि सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या फैलावाने सर्वांना चिंतेत टाकले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासिंयांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून केवळ ४० हजार एवढीच राहील, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांच्या मदतीने भविष्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येचे आकलन करणारे मॉडेल तयार केले आहे. शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या संशोधनामधून जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार पुढच्या तीन-ते चार महिन्यांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणार आहे. तसेच फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात कोरोनाचे केवळ ४० हजार अॅक्टिव्ह रुग्ण उरतील, असा दावा हर्षवर्धन यांनी केला.
coronavirus: "कोरोना नियंत्रणात येणार, फेब्रुवारीपर्यंत केवळ ४० हजार अॅक्टिव्ह रुग्ण उरणार"
By बाळकृष्ण परब | Published: October 19, 2020 7:08 PM
corona virus news : गेल्या काही दिवसांपासून देशात नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासिंयांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
ठळक मुद्देपुढच्या तीन-ते चार महिन्यांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणार फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात कोरोनाचे केवळ ४० हजार अॅक्टिव्ह रुग्ण उरतीलकोरोनाविरोधातील लसीकरण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत राज्य सरकारसोबत योग्य वेळी चर्चा केली जाईल