कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरासह भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोना व्हायरसची लक्षणं अनेक रुग्णांमध्ये अदृश्य स्वरूपाची असल्यामुळे काही ठिकाणी कोरोनाचा प्रभाव वाढत जात आहे. कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणं तुम्हाला माहीत असतीलच. कोरोनामुळे फुप्फुसांवर परिणाम होतो. श्वास घ्यायला त्रास होणं, सर्दी, सुका खोकला ही लक्षणं दिसतात. सध्या कोरोना व्हायरसबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे फक्त फुप्पुसांवरच परिणाम होत नाही तर हृदयावरही होतो. लाईव्ह सायन्सने याबाबत माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस हा फुप्फुसांसोबतच शरीरातील प्रत्येक भागांवर हल्ला करतो. कोरोनाच्या रुग्णांमध्ये मायकार्डीटीस हे हृदयाचं इन्फेक्शन दिसून आलं होतं. या रुग्णाला हृदयाचं इन्फेक्शन झालं म्हणून मृत्यू झाला, अशी माहिती न्यूयॉर्कमधील नॉर्थवेल हेल्थचे संचालक डॉ. एरिक यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसंच संक्रमण तोंड, डोळे, श्वासमार्गातून फुप्फुसांपर्यंत पोहोचतं. त्यानंतर रक्तद्वारे हे संक्रमण संपूर्ण शरारीत पसरतं. चीनमध्ये झालेल्या एका रिसर्चमध्ये कोरोना रुग्णांना हृदयाच्या समस्या उद्भवल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाने बाधित असललेल्या ५ पैकी एका रुग्णाला हृदयासंबंधी समस्या उद्भवत होत्या. हा रिसर्च जामा कार्डिओलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. ( हे पण वाचा-CoronaVirus : कोरोनाच्या महामारीमुळे लोकांमध्ये झाले आहेत 'हे' बदल)
हृदय आणि फुफ्फुसाच्या पेशींवर (ACE2) हे प्रोटिन असतं, ज्याच्यामार्फत व्हायरस पेशींमध्ये प्रवेश करतो. मात्र हेच प्रोटिन संरक्षण म्हणूनही कार्य करतं. अशी माहिती जॉन्स होपकिन्स स्कूल ऑफ मेडिसीनच्या डॉ. एरिन मिशोस यांनी दिली आहे. ( हे पण वाचा-डाएट करूनही 'या' वयात वाढतं महिलांचं वजन, आधीच कारणं माहित करून घ्या आणि फिट रहा)