कोरोनाच्या वाढत्या प्रसारात लस कधी येणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच आहे. जर्मन बायोटेक कंपनी CureVac ने दावा केला आहे की, या कंपनीची कोरोना लस चाचणी दरम्यान माणसांवर परिणामकारक ठरली आहे. हा दावा लसीच्या शेवटच्या टप्प्यातील डेटा १ च्या आधारावर करण्यात आला आहे. CureVac चे प्रमुख अधिकारी फ्रँज-वर्नर हाज यांनी दावा केला आहे की, ''आम्ही या लसीच्या चाचणीतून समोर आलेल्या माहितीने खूप उत्साहित आहोत. कंपनी २०२० च्या शेवटापर्यंत मोठ्या स्तरावरील मानवी चाचणीला सुरूवात करण्याचा विचार करत आहे.''
CVnCoV या लसीचे सुरूवातीच्या चाचणीचे परिणाम सकारात्मक असून तज्ज्ञांचा उत्साह वाढवणारे आहेत. या लसीमुळे स्वयंसेवकांमध्ये इतक्या एंटीबॉडीज विकसित झाल्या होत्या जितक्या कोरोनाने ग्रासलेला गंभीर रुग्ण रिकव्हर झाल्यावर तयार होतात. जगभरात कोरोना व्हायरसच्या १५० पेक्षा जास्त लसींवर काम सुरू आहे. यात १० लसी या अडवांस स्टेजच्या मानवी परिक्षणातसाठी तयार आहेत.
CureVac कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या चाचणीत आतापर्यंत २५० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असून लसीमुळे T सेल्सही जनरेट झाले आहेत. अजूनही स्वयंसेवकांवर परिक्षण सुरू आहे. लसीचे साईड इफेक्ट्स जास्तीत जास्त इंजेक्शन दिल्यानंतर काहीवेळ पाहायला मिळतात. थकवा, डोकेदुखी, मासपेशीतील वेदना, ताप यांसारखे साईड इफेक्ट्स स्वयंसेवकांमध्ये २४ ते ४८ तासांपर्यंत दिसून आले होते. ही लस mRNA वर आधारित आहे.
CureVac ची लस मेसेंजर आरएनए (mRNA) चा वापर करते. अनेक लसींमध्ये या पद्धतीचा वापर केला जात आहे. अमेरिकन कंपनी मॉडर्नाची लसही एमआरएनए बेस्ड आहे. याव्यतिरिक्त फायजर आणि त्याची जर्मन पार्टनर बायोएनटेकची लसही यावर आधारित आहे. कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये शर्यत सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लसीचे प्रयोग केले जात आहेत.
mRNA लसीचा एक नवीन प्रयोग आहे. आतापर्यंत जगभरात यावर आधारित लसीला मंजूरी मिळालेली नाही. साधारणपणे ही लस शरीरातील प्रोटीन्सची ओळख पटवून व्हायरसशी त्यांच्याशी लढण्यासाठी तयार असते. कोणत्याही पेशींमध्ये एमआरएन प्रोटीन तयार करण्यासाठी टेम्पलेटप्रमाणे वापर केला जातो. याशिवाय प्रोटीन्स एकत्र जोडून व्हायरस तयार होत नाही. लसीमुळे इम्यून सिस्टीम प्रोटिन्स डिटेक्ट करते. त्यानंतर डिफेंसिव्ह रेस्पांस तयार करण्याला सुरूवात होते. कोरोनाकाळात थंडीच्या वातावरणात कसे राहाल निरोगी? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या ८ टिप्स
अनेक कंपन्या कोरोनाची लस तयार करण्यासाठी एमआरएनए तंत्राचा वापर करत आहेत. जास्तीत जास्त लसी या परंपरागत पद्धतींवर आधारीत आहेत. ब्रिटिश फार्मा एक्स्ट्राजेनकाने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत मिळून जी लस तयार केली आहे ती लससुद्धा एमआरएनएवर आधारित आहे. भारतात विकसित झालेली कोवॅक्सिन ही लस SARS-CoV-2 तसंच स्ट्रेन आयसोलेट करून तयार करण्यात आली आहे. ...म्हणून ४३ टक्के भारतीयांना करावा लागतोय डिप्रेशनचा सामना, नव्या संशोधनातून समोर आलं कारण